कोकण

क्रिकेट स्पर्धेत चिपळूण ''अ'' संघ विजयी

CD

चिपळूण ‘अ’ संघ
क्रिकेट स्पर्धेत विजयी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २७ः तालुका वकील संघ व न्यायालयीन कर्मचारी यांच्यातर्फे पवन तलाव मैदानात क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती. त्यामध्ये चिपळूण ‘अ’ संघाने दापोली ‘अ’ संघाचा पराभव करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केला. या स्पर्धेत १६ संघानी सहभाग घेतला होता.
चिपळूण येथे झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे, दिवाणी न्यायाधीश पी. आर. कुलकर्णी चिपळूण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुका वकील संघाचे अध्यक्ष अॅड. नितिन सावंत व उपाध्यक्ष अॅड. नयना पवार, ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. जे.के. रेळेकर, अॅड. डी. एस. दळी, अॅड. व्ही. एस. शिगवण, अॅड. एन. एस. केळकर, अॅड. एन. जी. लाड, एम. एस. यादव, अॅड. केतकर, अॅड. दलवाई, अॅड. आवले, अॅड. कांबळी, अॅड. तावडे, अॅड. चिमणे व इतर वकील वर्ग उपस्थित होता.
या स्पर्धेत चिपळूण ‘ब’ संघाला तिसरा व खेड ‘अ’ संघाला चौथा क्रमांक मिळाला आहे. पारितोषिक वितरण उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत मालिकावीर अॅड. योगेश दांडेकर, उत्कृष्ट गोलंदाज गोरख शिर्के, उत्कृष्ट फलंदाज म्हणून अॅड. रोहन बापट यांची निवड करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

देशी-विदेशी दारू महागल्याने विक्री घटली! जुलै-ऑगस्टमध्ये गतवर्षीपेक्षा यंदा देशी व विदेशी दारूत ‘इतक्या’ लिटरची घट; दारूचे दर किती आहेत? वाचा...

आजचे पंचांग आणि दिनविशेष -12 सप्टेंबर 2025

ढिंग टांग : मनोमीलन : अंक दुसरा…!

दुर्दैवी घटना! 'पंक्‍चरचे चाक बदलणे तरुणाच्‍या बेतले जिवावर'; तेटलीत मोटारीखाली सापडून मृत्‍यू, गर्भवती पत्नीचा आक्रोश, गाडीचा जॅक निसटला अन्..

Godown Fire:'सातारामधील कोडोलीत गोडाऊनला भीषण आग'; इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्‍तूंसह वाहनेही खाक, लाखोंच्‍या नुकसानीचा अंदाज

SCROLL FOR NEXT