कोकण

खुराड्यात अडकलेला बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद

CD

80381

खुराड्यात अडकलेला
बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद
चार तास रेस्क्यू ऑपरेशन ; तरूणाचे प्रसंगावधान
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर ता. २७ ः तालुक्यातील तुरळ येथे मुंबई गोवा महामार्गानजिक असलेल्या मधुकर कुंभार यांच्या कोंबड्याच्या खुरड्यात बिबट्या अडकला. आज रविवारी सकाळी साडेसहा वाजता हा प्रकार घडला.
सकाळी साडेसहाच्या सुमारास हा बिबट्या या खुराड्यात घुसला व यातील काही कोंबड्या फस्त केल्या. याची चाहूल अवधुत याला लागताच त्याने धाव घेतली व या खुराड्यात गेला असता आत बिबट्या असल्याचे लक्षात येताच मागचं पाऊल घेत प्रसंगावधान राखत खुराड्याचा दरवाजा बंद केला व बिबट्या आत कैद झाला. यावेळी बिबट्याने खुरड्यातील कोंबड्या फस्त केल्याचे समजते. तत्काळ याची माहिती वनविभाग व संगमेश्वर पोलीस ठाण्याला देण्यात आली.
माहिती मिळताच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण हे त्याचे सहकारी कॉन्स्टेबल संदेश जाधव, सोमनाथ खाडे, गिरप्पा लोखंडे, सिद्धेश आंबरे अरुण वानरे, रमेश गावित यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी ग्रामस्थांनी बिबट्याला पहाण्यासाठी गर्दी केली होती. वनविभागाचे वनपाल न्हानू गावडे हे आपले सहकारी वनरक्षक सहयोग कराडे, आकाश कडुकर, सुप्रिया काळे, किरण पाचर्णे, शर्वरी कदम यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. सुमारे चार तासानंतर बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश आले.

ENG vs IND: जडेजासोबत इंग्लंडच्या खेळाडूंची बाचाबाची? मँचेस्टर कसोटीच्या शेवटी नेमकं काय घडलं? पाहा Video

ENG vs IND, 4th Test : टीम इंडिया लढली, भडली अन् मँचेस्टर कसोटीही वाचवली! गिलपाठोपाठ जडेजा, वॉशिंग्टनचीही शतकं

Crime News: भाजप नेत्याचा मुलाला ड्रग्जसह अटक! युवतीसोबत पळून जाताना थांबवले तर पोलिसांच्या अंगावर घातली गाडी

Dhananjay Munde: ...तर त्याला फाशी द्या, धनंजय मुंडे यांचे वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?

ENG vs IND 4th Test: जडेजाने इतिहास घडवला! गॅरी सोबर्स यांचा ५९ वर्षे जुन्या विक्रमाची बरोबरी; लक्ष्मणच्याही पंक्तीत स्थान

SCROLL FOR NEXT