कोकण

रत्नागिरी- मिरकरवाडा बंदर विकासाच्या दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन

CD

rat२७p३८.jpg-
रत्नागिरी : मिरकरवाडा येथील कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नीतेश राणे.

८०३४१

मच्छीमारांना आर्थिक सक्षम करणार
नीतेश राणे ः मिरकरवाडा बंदराच्या दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ ः मच्छीमार बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि कोकण किनारपट्टीचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी आम्ही अतिक्रमणासारख्या कठोर निर्णयांचीही भीती बाळगली नाही. या बंदराच्या आणि पर्यायाने इथल्या मच्छीमारांच्या विकासासाठी चांगल्या दर्जाची कामे केली जातील, असा विश्वास मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नीतेश राणे यांनी व्यक्त केला. मिरकरवाडा बंदराच्या दुसऱ्या टप्प्याच्या विकास प्रकल्पाचे भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.
राणे म्हणाले, ‘महायुती सरकार सत्तेत आले, तेव्हा आम्ही कोकण किनारपट्टीच्या सशक्तीकरणाच्या दृष्टीने पावले टाकायला सुरुवात केली. त्यात मिरकरवाडा बंदराचा विकास आमच्यासाठी महत्त्वाचा टप्पा होता. मात्र इथे अतिक्रमणाच्या अडचणी समोर आल्या. काहींनी आमच्याबद्दल गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला; पण आम्ही ठाम राहिलो आणि त्यामुळेच आजचा दिवस उजाडला आहे. हे सरकार हिंदुत्ववादी विचारसरणीचे आहे. भारत माता की जय म्हणणाऱ्या आणि देशाशी निष्ठा ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे भविष्य घडवण्यासाठी कटिबद्ध आहोत. इथले अतिक्रमण हटवताना पालकमंत्री उदय सामंत यांनी चांगले सहकार्य केले. त्यांचे या विकास प्रक्रियेकडे लक्ष आहे. तिसऱ्या टप्प्यातील विकासासाठी सज्ज आहोत. आजचा विकासाचा दृष्टिकोन मच्छीमार समाजाच्या भविष्यासाठी महत्त्वाचा आहे.’’
पालकमंत्री डॉ. उदय सामंत, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, माजी आरोग्य सभापती बाबू म्हाप, शिवसेना शहराध्यक्ष बिपिन बंदरकर, माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी, माजी नगरसेवक राजन शेट्ये, भाजप शहराध्यक्ष दादा ढेकणे, महिला जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, तालुकाध्यक्ष दादा दळी, मत्स्य विकास आयुक्त किशोर तावडे आदी उपस्थित होते.

चौकट
बंदरातील सोयीसुविधा
दुसऱ्या टप्प्यात विविध विकासकामांचा समावेश असून, बंदराची कार्यक्षमता वाढवण्यासाठी साठवण क्षमता, बर्फ कारखाने, सांडपाणी व्यवस्था, मासेमारीची यंत्रणा आणि इतर सोयी सुविधा यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: जडेजासोबत इंग्लंडच्या खेळाडूंची बाचाबाची? मँचेस्टर कसोटीच्या शेवटी नेमकं काय घडलं? पाहा Video

ENG vs IND, 4th Test : टीम इंडिया लढली, भडली अन् मँचेस्टर कसोटीही वाचवली! गिलपाठोपाठ जडेजा, वॉशिंग्टनचीही शतकं

Crime News: भाजप नेत्याचा मुलाला ड्रग्जसह अटक! युवतीसोबत पळून जाताना थांबवले तर पोलिसांच्या अंगावर घातली गाडी

Dhananjay Munde: ...तर त्याला फाशी द्या, धनंजय मुंडे यांचे वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?

ENG vs IND 4th Test: जडेजाने इतिहास घडवला! गॅरी सोबर्स यांचा ५९ वर्षे जुन्या विक्रमाची बरोबरी; लक्ष्मणच्याही पंक्तीत स्थान

SCROLL FOR NEXT