कोकण

चिपळूण-मटण-मच्छीमार्केटच्या इमारतीची दुरुस्ती सुरू

CD

80475

मटण-मच्छीमार्केटच्या इमारतीची दुरुस्ती सुरू
चिपळूण पालिकेकडून लवकरच होणार लिलाव

चिपळूण, ता. २८ ः येथील मटण-मच्छीमार्केटच्या इमारतीची दुरुस्ती सुरू झाली आहे. त्यामुळे मटण-मच्छीमार्केटमधील लिलाव प्रक्रियेचा मार्ग लवकरच मोकळा होणार आहे.
मटण-मच्छीमार्केटमधील गाळ्यांची पुढील ३० वर्षाच्या कालावधीसाठी लिलाव प्रक्रिया लवकरच केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर दोन महिन्यांपूर्वी विक्रेत्यांची पालिकेत बैठक झाली होती. बैठकीत विक्रेत्यांनी काही दुरुस्त्या सुचवल्या होत्या. पालिकेने या इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट करून घेतले. पुण्यातील एका एजन्सीने काही उपाययोजना सुचवल्या. त्यानुसार संबंधित इमारतीतील आवश्यक त्या सुविधा व दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.
मटण-मच्छीमार्केटची ही इमारत साधारणपणे नऊ वर्षे जुनी आहे. ही इमारत गेल्या अनेक वर्षांपासून विनावापर पडून आहे. इमारत वापरात आणण्यासाठी पालिका प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. काही महिन्यांपूर्वी या इमारतीचे मूल्यांकन पालिकेला प्राप्त झाले होते. त्यानुसार मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, त्याअगोदर संबंधित विक्रेत्यांची पालिकेत बैठक घेण्यात आली. त्या वेळी ३० वर्षाच्या कालखंडासाठी ही इमारत लिलावाने देण्याचा धोरणात्मक निर्णय झाला होता. या बैठकीमध्ये व्यापाऱ्यांनी काही सूचनाही केल्या होत्या. आता पालिकेने या इमारतीच्या ढासळलेल्या बांधकामाच्या ठिकाणी प्लास्टर व इतर डागडुजीची कामे हाती घेतली आहेत.

चौकट
एक नजर
*जागेचे एकूण क्षेत्रफळ - २,८१६ चौरस मीटर
*गाळ्यांची संख्या - ४३
*दर्शनी भागातील गाळ्यांचे प्रतिमहिना भाडे - ३,६५० रुपये
*मागील भागातील गाळ्यांचे प्रतिमहिना भाडे - २,९०० रुपये
*दर्शनी भागातील १ ते १५ गाळे व्यापारी संकुलासाठी आरक्षित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin yojana: लाडक्या बहीणींचा कोट्यावधींचा घोटाळा, ९ हजार सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला डबल लाभ, भावाला फसवलं

Pune Airport: सुविधांमध्ये पुणे विमानतळ आघाडीवर; एसीआय-एएसक्यूचे सर्वेक्षण, चौथ्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर झेप

Solapur News:'चंद्रभागेने इशारा पातळी ओलांडली'; पंढरपुरातील सर्व घाट बंद, तालुक्यातील आठ बंधारे पाण्याखाली

Viswanathan Anand: विश्वकरंडक जिंकणाऱ्या दिव्या देशमुखच्या धैर्यशील खेळाची विश्‍वनाथन आनंद यांच्याकडून स्तुती

Panchganga River Flood : धरणातील विसर्गामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढली, आलमट्टीचीही मदत

SCROLL FOR NEXT