कोकण

विद्यार्थ्यांनी अनुभवले व्यावसायिक ज्ञान

CD

80741

विद्यार्थ्यांनी अनुभवले व्यावसायिक ज्ञान
आरवलीतील रानभाजी प्रदर्शनः शाळा क्र. १ च्या उपक्रमास प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
आरोंदा, ता. २९ः आरवली शाळा क्र.१ (ता. वेंगुर्ले) येथे रानभाज्यांचे प्रदर्शन व विक्री उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांना व्यावहारिक कौशल्य ज्ञानाचे धडे मिळावेत, या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांना स्थानिक वनस्पती, पोषणमूल्ये, विक्री कौशल्य आणि पालकांशी संवाद साधण्याचा अनुभव मिळाला. या उपक्रमास पालकांचाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
''आनंददायी शनिवार'' उपक्रमांतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. रानभाज्यांचे प्रदर्शन व विक्री तसेच पालकांसाठी पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली. यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा डॉ. नेहा गावडे यांचे मार्गदर्शन मिळाले. त्यांनी पालकांसाठी पाककला स्पर्धेसह प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकासाठी तसेच दोन उत्तेजनार्थ पारितोषिके पुरस्कृत केली.
या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध रानभाज्यांचे आकर्षक स्टॉल्स साकारले. प्रदर्शनातून रानभाज्यांची माहिती आत्मसात केली. विविध प्रकारच्या भाज्यांची ओळख, त्यांचे उपयोग आणि पोषणमूल्य समजून घेतले. या रानभाज्यांची विक्रीही विद्यार्थ्यांनी स्वतः केली, ज्यातून व्यवसायिक कौशल्य व आत्मविश्वास विकसित झाला. विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
पाककला स्पर्धेमध्ये १५ स्पर्धकांनी सहभाग घेतला. परीक्षक म्हणून औषधी वनस्पती व रानभाज्या तज्ज्ञ रामचंद्र शृंगारे (कुडाळ) यांनी पाहिले. त्यांनी उपस्थितांना रानभाज्यांबाबत सखोल माहिती दिली. पाककला स्पर्धेत अनुक्रमे साक्षी शिरोडकर, संजना शेलटे व आरती पवार यांनी प्रथम तीन क्रमांक पटकावले. उत्तेजनार्थ दोघांना गौरविण्यात आले. सहभागी पालकांना डॉ. नेहा गावडे यांच्या हस्ते बक्षिसे वितरित करण्यात आली. मुख्याध्यापक वैभवी राय शिरोडकर यांनी प्रास्ताविक केले. प्रिया माडगुत यांनी आभार मानले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉ. नेहा गावडे, उपाध्यक्ष साक्षी शिरोडकर, सदस्य डॉ. प्रसाद साळगावकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी शिक्षिका संजीवनी कोकितकर, सविता सातपुते तसेच विद्यार्थी, पालक यांचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Price Hike : महागाईचा झटका ! एलपीजी सिलिंडरच्या दरात पुन्हा मोठी वाढ; जाणून घ्या घरगुती आणि व्यावसायिक LPG चे ताजे दर

Singapore Open Win: आधी सलग ४ वेळा अपयश, पण सिंगापूर ओपनमध्ये भारतीय वाघांची थेट पहिल्या स्थानावर मुसंडी!

Ujani Temple: उजनीतील प्राचीन स्थापत्यकलेचा वारसा पुन्हा उजेडात; पाणी साठा घटल्याने पळसनाथ मंदिराचे दर्शन, पाच दशकांनंतरही सुस्थितीत

Maharashtra Weather: राज्यात पुढील दोन दिवस वादळी पाऊस, मेघगर्जना आणि गारपिटीचा इशारा; अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

मोठी बातमी! सोलापूर जिल्ह्यात गावठी दारुच्या ५४ हातभट्ट्या, ४ वर्षांत दोन लाख लिटर दारु, ३० लाख रसायन लिटर नष्ट; गावागावांत हातभट्टीचा महापूर, वाचा...

SCROLL FOR NEXT