कोकण

कोकणातील शेतकऱ्यांकडे महायुती सरकारचे दुर्लक्ष

CD

80755

कोकणातील शेतकऱ्यांकडे
महायुती सरकारचे दुर्लक्ष

रूपेश राऊळ ः भरपाई कवडीमोल

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २९ ः यंदाच्या हंगामात पूर्वमोसमी व अवकाळी पावसाने आणि अनियमित पर्जन्यमानाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. असे असतानाही राज्याने नुकसानभरपाई देताना कोकणातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले आहे. यावरून भाजप-शिंदे सरकारचे कोकणावरील प्रेम बेगडी असल्याची टीका ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी केली.
श्री. राऊळ यांनी याबाबत पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. त्यात म्हटले आहे की, शासनाने अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३३७ कोटी रुपयांची मदत मंजूर केली. मात्र, कोकणाच्या वाट्याला केवळ ९ कोटी ३८ लाख २४ हजार रुपये आले. महाराष्ट्रातील इतर विभागांना कोट्यवधी रुपयांची मदत मिळत असताना कोकणाला मात्र कवडीमोल मदत मिळाल्याचे त्यांनी सांगितले. यातून कोकणातील शेतकरी आणि बागायतदारांविषयी सरकारचे बेगडी प्रेम स्पष्ट होते. कोकण विभागावर होत असलेला अन्याय स्पष्ट झाला आहे. मोठमोठ्या बाता मारणाऱ्या या येथील आमदार आणि नेत्यांची सत्तेतील किंमत यामुळे जनतेला दिसत आहे. भाजप-शिंदे सरकार स्वतःला शेतकऱ्यांचे कैवारी समजत असले तरी, कोकणातील शेतकरी मात्र उपाशीच दिसत आहेत. शेतकऱ्यांच्या विविध समस्यांकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. फळ पीक विम्याची रक्कम वेळेवर न मिळणे, अवकाळी पावसाने नुकसान होऊनही योग्य मदत न मिळणे, पिकाला हमीभाव न मिळणे तसेच वन्य प्राण्यांमुळे होणारे मोठ्या प्रमाणातील नुकसान, अशा अनेक समस्यांनी येथील शेतकरी आणि बागायतदार त्रस्त आहेत. हे सरकारला दिसत नाही, हे दुर्दैव आहे. कोकणातील शेतकरी आणि बागायतदारांच्या नुकसानीचे पंचनामे करूनही सरकारने त्यांची थट्टा केली आहे, असे राऊळ यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CNG दरवाढीचा नवा धक्का! गेल्या ११ दिवसांतील ही चौथी वाढ... मुंबई-पुण्यात दर किती?

'तो संपूर्ण रात्र दुसऱ्या महिलेसोबत राहिला तरी...' तबिंदा सनपाल नवऱ्याबद्दल बोलताना म्हणाली...'तो दर दिवाळीत तीन किलो सोनं देतो'

Chandgad Drowning Child : आजीच्या निधनामुळे गावी गेल्या अन् तीन शाळकरी मुलींचा शेततळ्यात बुडून मृत्यू, चंदगडमधील घटना; लहान भावाचे प्रयत्न असफल...

Buldhana Tragedy: पत्नीशी वादानंतर टोकाचे पाऊल! चार चिमुकल्यांना विहिरीत ढकलून पित्याने जीवन संपवले, बुलडाण्यात काळजाचा ठोका चुकवणारी घटना

Maharashtra Accident: सोमवार ठरला ‘अपघातवार’; एकच दिवशी १४ जणांचा मृत्यू, आंबेनळीत मोटार कोसळून आठ तर तिहेरी अपघातात सहा जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT