कोकण

कणकवलीत ३ ऑगस्ट रोजी ‘कविता परिवर्तनाच्या’ कार्यक्रम

CD

कणकवलीत तीन ऑगस्ट रोजी
‘कविता परिवर्तनाच्या’ कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २९ : सम्यक साहित्य संसद सिंधुदुर्गतर्फे ‘कविता वर्षावासाच्या-कविता परिवर्तनाच्या’ हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
शहरातील कणकवली कॉलेजच्या एचपीसीएल सभागृहात ३ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा ते दुपारी दीड या वेळेत या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमात मराठी साहित्य, नाट्य आणि संगीत क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत सामाजिक परिवर्तनाच्या संकल्पना या कवितांमधून सादर केल्या जाणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सम्यक साहित्य संसदचे अध्यक्ष अनिल जाधव हे आहेत. ज्येष्ठ कवी, कादंबरीकार आणि लोककला अभ्यासक डॉ. महेश केळुसकर यांच्या हस्ते उद्‍घाटन होईल. प्रमुख पाहुणे म्हणून कणकवली कॉलेजच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कवी प्रा. प्रवीण बांदेकर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात प्रमुख कवी आणि मराठी भाषा अभ्यासकांमध्ये वीरधवल परब, सुनील हेतकर, डॉ. अनिल धाकु कांबळी, प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर, प्रा. डॉ. सोमनाथ कदम, विठ्ठल कदम, सरिता पवार, प्रा. डॉ. नामदेव गवळी, प्रा. मोहन कुंभार, कल्पना मलये, प्रा. पूनम गायकवाड, पुरुषोत्तम कदम, नीलम यादव, प्रा. सुचिता गायकवाड, स्नेहा कदम सहभागी होणार आहेत.
मान्यवर कवींच्या कवितांचे अभिवाचन आणि सादरीकरण अभय खडपकर, राजेंद्र कदम, सचिन वळुंज, नीलेश पवार, सुदिन तांबे, प्रा. सीमा हडकर, विद्याधर तांबे, श्रेयस शिंदे, रुपाली कदम, शैलेश तांबे, सुषमा हरकुळकर, अनुष्का तांबे या नाट्यकलावंत व संवादकांच्या आवाजात सादर होणार आहे. त्यानंतर पाऊसगाण्यांची संगीतमय मैफल महेश काणेकर, संदेश रावले, राकेश मिठबावकर, संदेश तांबे, अमृता घाडी सादर करणार आहेत. या कार्यक्रमाला सर्व रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे कार्यवाह राजेश कदम, कोषाध्यक्ष संध्या तांबे, उपाध्यक्ष सिद्धार्थ तांबे, सहकार्यवाह मधुकर मातोंडकर आणि माजी अध्यक्ष अरुण नाईक यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fake Currency Racket Kolhapur : कोल्हापुरात बनावट नोटांचे रॅकेट, हजारोंच्या नोटांसह प्रिंटर ताब्यात; गोठ्यात करत होते कारनामा

Rishabh Pant is Back! दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाला बाद करण्यासाठी गोलंदाजांशी गमतीशीर संवाद, Video व्हायरल

फेक कॉल सेंटरचा मास्टरमाइंड फारुकीला गोव्यात ठोकल्या बेड्या; अलिशान सात कार केल्या जप्त, पोलिसांना टिप मिळाली अन्...

Sudhir Gadgil Letter Bomb : सांगली भाजपमध्ये उपऱ्यांचे इनकमींग, आमदार सुधीर गाडगीळांचा लेटरबॉम्ब; पालकमंत्र्यांची दिशाभूल

Gold Price Drop : दिवाळीनंतर सोन्याचे दर गडगडले! ८ दिवसांत सोन्यात ११,७००, तर चांदीत १७ हजारांची घसरण.

SCROLL FOR NEXT