कोकण

रत्नागिरी-प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर तीन महिने पगाराविना

CD

प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर तीन महिने पगाराविना
निधीमध्ये कपातीची वेळ; श्वानदंश, अनेक औषधांचा अपुरा साठा

चौकट
एक नजर
* वेतनासाठी दरमहा ३५ लाखांची गरज
* १०६ वैद्यकीय अधिकारी
* श्वानदंशाचा १ हजार इंजेक्शनचा साठा

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २९ः विविध योजनांसाठी केलेल्या आर्थिक तरतुदींमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण येत आहे. त्यामुळे अनेक विभागांच्या विकासकामांच्या निधीमध्ये मोठी कपात करण्याची वेळ सरकारवर आली आहे. अनेक खात्यांमधील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना पगार वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत असतानाच जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्रातील १०६ वैद्यकीय अधिकाऱ्यांनादेखील याचा फटका बसला आहे. गेल्या ३ महिन्यांपासून ते पगाराविना काम करत आहेत. श्वानदंशासाठी आवश्यक असणाऱ्या इंजेक्शनसह अनेक औषधांचा अपुरा साठा असल्याने रुग्णसेवेवर परिणाम होऊ लागला आहे.
राज्याच्या तिजोरीत असलेला खडखडाट आरोग्य विभागाला होऊ लागला आहे. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्रातील १०६ वैद्यकीय अधिकारी गेल्या ३ महिन्यांपासून पगाराच्या प्रतिक्षेत आहेत. दरमहा ३५ लाख रुपये या अधिकाऱ्यांना वेतन देण्यासाठी आवश्यक असतात. गेले ३ महिने हे पैसे मिळालेले नाहीत. एप्रिलपासून पगारच झालेला नाही. दुसरीकडे जिल्हा परिषदच्या आरोग्यखात्यात औषधांचादेखील तुटवडा जाणवू लागला आहे. श्वानदंश झाल्यास देण्यात येणाऱ्या इंजेक्शनचा साठा आता संपत आला आहे. श्वानदंश झाल्यास व्यक्तीला ५ इंजेक्शन्स घ्यावी लागतात. अलीकडच्या काळात शहरात गल्लोगल्ली भटकी कुत्री धुमाकूळ घालत असतानाच श्वानदंशाच्या इंजेक्शनचा साठा अपुरा पडू लागला आहे.
शहरी भागात श्वानदंशाचे प्रमाण अधिक आहे. गेल्या वर्षभरात १८ हजार ३१७ इतक्या व्यक्तींना श्वानदंश झाला. हा आकडा लक्षात घेता आरोग्य विभागाने इंजेक्शनचा पुरेसा साठा मागवला असला तरी तो अजून उपलब्ध झालेला नाही. रत्नागिरी जिल्ह्यात ६७ प्राथमिक आरोग्यकेंद्रे आहेत आणि जेमतेम १ हजार इंजेक्शनचा साठा शिल्लक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WCL 2025 स्पर्धेतून युवराज सिंगच्या भारतीय संघाची माघार; पाकिस्तानविरुद्ध सेमीफायनलवर बहिष्कारानंतर...

Post Office Scheme: ५ वर्षात १३ लाखांचा परतावा अन्...; पती-पत्नीसाठी पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ठरतेय फायद्याची!

Latest Marathi News Updates : ठाण्यात कंपनीची सुरक्षा भिंत कोसळली, वाहनांचे नुकसान

New Born Baby Care Tips: नवजात बाळाला मालिश व धुरी देणं खरंच योग्य आहे का? वाचा बालरोगतज्ज्ञ काय सांगतात

ENG vs IND, 5th Test: अर्शदीपचे पदार्पण होणार का अन् बुमराह खेळणार की नाही? शुभमन गिलने सर्वच सांगितलं; म्हणाला..

SCROLL FOR NEXT