कोकण

टाकाऊतून टिकाऊ राखी निर्मितीत कोमल सावंत प्रथम

CD

-rat२९p२४.txt-
२५N८०७३६
सावर्डे ः राखी तयार करण्याच्या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांसह शिक्षक.
---
टाकाऊतून राखी निर्मितीत कोमल प्रथम
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. २९ : सावर्डे येथील गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विज्ञान छंद मंडळाच्यावतीने ‘एक देश, एक राखी’ या उपक्रमाअंतर्गत टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ राखी तयार करण्याच्या स्पर्धेत कोमल सावंत हिने प्रथम क्रमांक पटकावला तर तिर्था कोकाटे द्वितीय आणि आरोही चव्हाणने तृतीय क्रमांक मिळवला. आराध्या थरवळ आणि दुर्वा परकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.
मातृभूमीच्या रक्षणासाठी अहोरात्र सज्ज असलेल्या जवानांसाठी या राख्या पाठवून विद्यार्थ्यांनी देशभक्तीचा अनोखा संदेश दिला.
पाचवी ते आठवीतील १२० विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी नैसर्गिक व पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्याचा वापर करून आकर्षक राख्या तयार केल्या. या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना जागवणे, पर्यावरण संवर्धनाचे भान निर्माण करणे व भारतीय संस्कृती जोपासणे हे होते. या उपक्रमाचे उद्‍घाटन व पारितोषिक वितरण विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे व उपप्राचार्य विजय चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. विज्ञान शिक्षक वर्षा चव्हाण, श्रेया राजेशिर्के, वैभवी भुवड, कविता हळदीवे, दामिनी महाडीक आणि सुधीर कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुज'ची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी इराणने घातली 'ही' अट; जगभरातले देश टेंन्शनमध्ये

'अजूनही धडा घेतला नाही...'; NEET पेपर लीकवर NTA ला फटकारत सुप्रीम कोर्टाची केंद्र आणि CBI ला नोटीस

Yewalewadi Murder Case: येवलेवाडीत चारित्र्यावर संशय घेऊन पतीकडून पत्नीचा गॅस टाकीने खून

Latest Marathi News Live Update : नीट पेपरफुटी प्रकरण; पुण्यातील आणखी प्राध्यापक सीबीआयच्या रडारवर

Kothrud fraud Case : कोथरूडमध्ये फ्लॅट विक्रीच्या बहाण्याने भागीदाराला अडीच कोटींचा गंडा; आर. के. लाईफस्पेस डेव्हलपर्सवर गुन्हा

SCROLL FOR NEXT