कोकण

देवगड तालुक्यात नागपंचमी उत्साहात

CD

80847

देवगड तालुक्यात नागपंचमी उत्साहात

श्रावणातील पहिला सण; मंगळागौर पूजनाने आनंद द्विगुणित

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २९ ः तालुक्यात ठिकठिकाणी पारंपरिक पद्धतीने आज नागपंचमी हा श्रावणातील पहिला सण उत्साहाने साजरा झाला. श्रावणातील पहिली मंगळागौर हा सणही आज असल्याने महिलांचा उत्साह वाढला होता. पाऊस नसल्याने सणाचा आनंद अधिकच द्विगुणित झाला. मंगळागौर सणानिमित्त आज नवविवाहितांच्या घरी रात्री फुगड्या रंगणार आहेत.
कोकणात नागपंचमी सणाला विशेष महत्त्व आहे. श्रावण महिन्यातील येणारा हा पहिला सण. या दिवशी काही चाकरमानीही उत्सवासाठी गावी येतात. बाजारात विविध आकार आणि रंगांत नाग प्रतिमा विक्रीस असतात. साधारणतः ६० ते १२० रुपये नगाप्रमाणे नाग प्रतिमा विकल्या गेल्या. ग्रामीण भागात गणेश चित्रशाळांमध्ये नाग प्रतिमा उपलब्ध असतात. पारंपरिक ठिकाणाहून नाग प्रतिमा घेण्याची गावपातळीवर पद्धत असते. काही तरुण स्वतःच मातीच्या नाग प्रतिमा तयार करतात. सणासाठी लागणाऱ्या लाह्या, दूध, फळे, फुले यांची बाजारात उलाढाल असते. नागपंचमी सणाला बच्चे कंपनीची विशेष मौज असते. घरोघरी असलेल्या नाग प्रतिमांचे विसर्जन करण्यासाठी त्यांची धांदल असते. आज पाऊस नसल्याने उत्सवाची मजा वाढली होती. आजच श्रावणातील पहिला मंगळवार असल्याने नवविवाहितांच्या घरी मंगळागौर पूजनाची धांदल होती. या निमित्ताने रात्री फुगड्या रंगतील. एकूणच सणाची वाढती मजा सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Schedule: जेतेपदासाठी लढण्यास टॉप - ४ संघ सज्ज! कधी अन् कुठे रंगणार प्लेऑफचे सामने? नोट करून ठेवा

IPL 2026: मुंबई इंडियन्सविरुद्ध राजस्थानने 'ती' चाल खेळली अन् पंजाब-कोलकाताचा गेम केला; कर्णधार रियान परागचा खुलासा

MI vs RR: वैभव सूर्यवंशीचा वर्ल्ड रेकॉर्ड! मुंबई इंडियन्सविरुद्ध ४ धावांवर आऊट होऊनही घडवलाय इतिहास

IPL 2026 Final Points Table: अजिंक्य रहाणे लढला, पण KKR हरले! दिल्लीने शेवटचा सामना जिंकला अन् CSK ला टाकले मागे

Trump on Iran: अमेरिका-इराण चर्चेत मोठी घडामोड! अण्वस्त्र बनवू देणार नाही, करार होईपर्यंत निर्बंध कायम; ट्रम्प यांचा इशारा

SCROLL FOR NEXT