rat३१p१७.jpg, rat३१p१८.jpg,rat३१p१९.jpg-
२५N८११६२
रत्नागिरी : शॉटगन स्पर्धेत यश मिळवणाऱ्या वरा व कार्तिकी देवळेकर आणि आई-वडील.
शॉटगन स्पर्धेत वरा, कार्तिकीचे यश
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३१ : शॉटगन शूटिंग स्पर्धेत वरा व कार्तिकी देवळेकर यांनी रौप्य व कास्यपदक पटकावले. पुणे, बालेवाडी येथे झालेल्या महाराष्ट्र रायफल संघटना आयोजित २८व्या कॅप्टन इजिकल शूटिंग चॅम्पियनशिप शॉटगन स्पर्धेमध्ये वरा देवळेकरला ज्युनियर डबल ट्रॅप शुटींगमध्ये रौप्य पदक व कार्तिकी देवळेकरला कास्यपदक मिळाले. त्यांची निवड पूर्व राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली. त्या महाराष्ट्र रायफल संघटनेचे नेतृत्व करणार आहेत. बालेवाडी रेंज प्रशिक्षक सिद्धार्थ पवार यांनी प्रशिक्षण दिले. हेमंत बालवडकर यांचे मार्गदर्शन लाभले. सिद्धांत रायफल क्लबचे अध्यक्ष विजय खारकर, सचिव व राष्ट्रीय नेमबाज किसन खारके, सदस्य अलंकार कोळी, उद्योजक सौरभ मलुष्टे व मित्रपरिवाराने अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.