कोकण

सावंतवाडीत स्मार्ट मीटर विरुद्ध उद्या ‘एल्गार’

CD

81691

सावंतवाडीत स्मार्ट मीटर विरुद्ध उद्या ‘एल्गार’

सर्वपक्षीयांचा इशारा; जनआंदोलन समितीकडून नियोजन

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २ ः तालुक्यात महावितरणचा लपंडाव सुरू आहे. त्याला ग्राहक वैतागून गेले आहेत. आता स्मार्ट मीटर ग्राहकांच्या माथी मारण्यात येत आहेत. त्या विरोधात सर्वपक्षीयांनी एकत्र येऊन महावितरण विरोधात एल्गार पुकारण्याचे ठरविले आहे. सोमवारी (ता. ४) येथील वीज वितरण कार्यालयात जमून स्मार्ट मीटरविरोधात तक्रारी पुन्हा एकदा मांडण्यात येणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अॅड. अनिल केसरकर यांनी दिली.

येथील विश्रामगृहावर सर्व पक्षीय जनआंदोलन समितीची बैठक झाली. यावेळी झालेल्या नियोजित आंदोलनाची माहिती अॅड. केसरकर यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘स्मार्ट मीटर ग्राहकांच्या माथी मारणे सुरू आहे. त्यामुळे ग्राहकांना भरमसाट बिले येत आहेत. ग्रामीण भागातील ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. जनतेत जागृती करून वीज ग्राहकांना एकत्रित करून भव्य मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. स्मार्ट मीटरविरोधात न्यायालयात धाव घेतली पाहिजे. स्मार्ट मीटरची सक्ती हाणून पाडण्यासाठी भूमिका घेतली जाणार आहे. सावंतवाडी तालुक्यातील ४ हजार ग्राहकांच्या घरी स्मार्ट मीटर बसविले आहेत. त्यात सावंतवाडी शहरात १ हजार ग्राहकांचा समावेश आहे. जबरदस्तीने स्मार्ट मीटर ग्राहकांच्या माथी मारत असतील तर ते हाणून पाडण्यासाठी सोमवारी (ता. ४) सकाळी ११ वाजता वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात स्मार्ट मीटरबाबतच्या तक्रारी दाखल करण्यासाठी उपस्थित राहावे.’’
यावेळी ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, शहर संघटक निशांत तोरसकर, मनसे जिल्हाध्यक्ष अॅड. केसरकर, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे पुंडलिक दळवी, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, वीज ग्राहक जिल्हाध्यक्ष संजय लाड, ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख शैलेश गवंडळकर, आशिष सुभेदार, देवेंद्र टेमकर, काँग्रेस शहराध्यक्ष अॅड. राघवेंद्र नार्वेकर, रफिक मेमन, अॅड. राजू कासकर, महेश नार्वेकर आदी उपस्थित होते.
-------
१५ आॅगस्टला होणार आंदोलन
ठाकरे शिवसेना शहर संघटक निशांत तोरसकर यांनी, सोमवारी स्मार्ट मीटर विरोधात तक्रार असलेल्या ग्राहकांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात जमून तक्रार दाखल करावी. नंतर जनआंदोलनाबाबत भूमिका ठरविण्यात येईल, असे सांगितले. येत्या १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावर वीज ग्राहकांचे आंदोलन आयोजित केल्याची माहिती संजय लाड यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yugendra Pawar Engagement: युगेंद्र पवार एक पाऊल पुढे... तनिष्का सोबत झाला साखरपुडा; मुंबईत रंगला भव्य सोहळा

Maharashtra Education : मराठी शाळांच्या सहभागाशिवाय 'विकसित महाराष्ट्र २०४७' व्हिजनची अंमलबजावणी कठीण

Kolhapur Circuit Bench Cases : १ लाख ७५ हजार खटले सर्किट बेंचकडे येणार, दोन न्यायाधीशांचे बेंच, जनहित याचिकाही शक्य होणार

रस्त्यावर पहाटे ४ पर्यंत दारूच्या नशेत लोळत पडलेला असायचा अभिनेता; पोलीस पकडायचे आता आहे अफाट श्रीमंत

Latest Marathi News Updates Live : सांगलीतील मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थ्यांचं आंदोलन चिघळलं

SCROLL FOR NEXT