कोकण

चिपळूण रेल्वेस्टेशनला जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था

CD

-rat२p८.jpg-
२५N८१६८५
चिपळूण ः रस्त्याची पाहणी करताना शिवसेनेचे पदाधिकारी.
-----
चिपळूण स्टेशनला जोडणाऱ्या मार्गाची दुरवस्था
शिवसेना आक्रमक ; दोन्ही बाजूने अतिक्रमण, रस्ता अरुंद
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २ : शहरातून कोकण रेल्वेस्टेशनकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्याची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, अमेय पार्क ते मुरादपूर या मार्गावरील नागरिक व प्रवाशांना खड्ड्यांमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरून एसटी महामंडळाच्या गाड्या रेल्वे प्रवाशांचे ने-आण करत असतात; मात्र रस्त्याची मोडकळीस आलेली अवस्था जीवघेणी ठरत आहे.
नऊ मीटर रस्ता केवळ तीन मीटर वापरासाठी उरला असून दोन्ही बाजूंनी अतिक्रमण व झाडी यामुळे मार्ग अरुंद झाला आहे. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः पावसाळ्यात या रस्त्यावरील खड्डे पाण्याने भरल्यामुळे अपघात होण्याचा धोका वाढतो आहे. शिवसेनेचे शहरप्रमुख उमेश सकपाळ यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह अमेय पार्क ते मुरादपूर या मार्गाची पाहणी केली. पाहणीनंतर संबंधित विभागाने तातडीने रस्ता दुरुस्त करावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल, असा इशारा उमेश सकपाळ यांनी दिला.
हा मार्ग प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून सार्वजनिक वाहतुकीचा मुख्य दुवा आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. शिवसेना या प्रकरणी गप्प बसणार नाही, असे सकपाळ यांनी ठणकावून सांगितले. या भागातील स्थानिक नागरिकांनीदेखील रस्त्याच्या दुरवस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही उपाय न झाल्याचे सांगितले. आता शिवसेनेने पुढाकार घेतल्याने या मार्गाच्या दुरुस्तीकडे लक्ष वेधले गेले आहे. प्रशासनाने याची तत्काळ दखल घ्यावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
---
प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
नऊ मीटर रस्ता केवळ तीन मीटर वापरासाठी उरला असून दोन्ही बाजूंनी अतिक्रमण व झाडी यामुळे मार्ग अरुंद झाला आहे. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yugendra Pawar Engagement: युगेंद्र पवार एक पाऊल पुढे... तनिष्का सोबत झाला साखरपुडा; मुंबईत रंगला भव्य सोहळा

Maharashtra Education : मराठी शाळांच्या सहभागाशिवाय 'विकसित महाराष्ट्र २०४७' व्हिजनची अंमलबजावणी कठीण

Kolhapur Circuit Bench Cases : १ लाख ७५ हजार खटले सर्किट बेंचकडे येणार, दोन न्यायाधीशांचे बेंच, जनहित याचिकाही शक्य होणार

रस्त्यावर पहाटे ४ पर्यंत दारूच्या नशेत लोळत पडलेला असायचा अभिनेता; पोलीस पकडायचे आता आहे अफाट श्रीमंत

Latest Marathi News Updates Live : 16 वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलीचं अपहरण करत केला विनयभंग

SCROLL FOR NEXT