कोकण

मंडप कामगार-ठेकेदार यांच्यातील वादात मध्यस्थी

CD

-rat२p६.jpg-
२५N८१६८३
सावर्डे : भोईवाडा पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारासमोर कामगारांना मार्गदर्शन करताना मनसेचे जितेंद्र चव्हाण.
----
मंडप कामगार-ठेकेदार वादात मध्यस्थी
जितेंद्र चव्हाण ः मोबदल्यासह इतर मागण्या
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. २ ः गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच कोकणातील मुंबईत काम करणारे मंडप कामगार व ठेकेदार यांच्यामध्ये कामाचा मोबदला आणि इतर मागण्यांवरून झालेल्या वादात कडवई (ता. संगमेश्वर) येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जितेंद्र चव्हाण यांनी यशस्वी मध्यस्थी केली. त्यांनी हा वाद सोडवण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. त्यामुळे कामगारवर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे.
मुंबईमध्ये कोकणातील हजारो कामगार मंडप बांधणीमध्ये कामासाठी जातात. गणपती सणाच्या तोंडावर ठेकेदार आणि कामगार यांच्यामध्ये कामाचा मोबदला आणि इतर मागण्यावरून वाद निर्माण झाला होता. हा वाद मुंबईतील भोईवाडा पोलिस ठाण्यापर्यंत पोहचला. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेत कडवई येथील मुंबईस्थित मनसेचे कार्यकर्ते संजय धामनाक, शांताराम राक्षे व योगेश कुवळेकर यांनी ही बाब मनसेचे जितेंद्र चव्हाण यांच्या कानावर घातली. चव्हाण यांनी मुंबईमध्ये दाखल होत या कामगारांना एकत्र करून प्रशासन, ठेकेदार आणि कामगार यांच्यामध्ये योग्य समन्वय साधला. त्या ठिकाणी कामगारांची सभा घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या सभेला साडेसातशे कामगार उपस्थित होते. सभेनंतर चव्हाण यांनी सर्व कामगारांसह भोईवाडा पोलिस ठाण्यावर धडक मारत वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन कदम यांची भेट घेतली. या वेळी कदम यांनी कामगार व ठेकेदार यांच्याशी चर्चा करून योग्य तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले. तसेच मुंबई नाका कामगार, मुकादम व मुंबई डेकोरेटर्स असोसिएशन मालक संघटना यांच्यामध्ये मनसेचे नेते संजय नाईक यांनी पुढाकार घेतला. या सर्वांशी सकारात्मक चर्चा होऊन पगारवाढ व इतर समस्यांवर समाधानकारक तोडगा काढण्यात आला. या वेळी चव्हाण यांच्या सोबत संजय धामणाक, शेखर नलावडे, नंदकुमार फडकले, परेश धामनाक, दिनेश चिले, मुकादम कृष्णा बेंडल, संजय सावंत, राम डिके, संतोष डिके, संजय पंडियार आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yugendra Pawar Engagement: युगेंद्र पवार एक पाऊल पुढे... तनिष्का सोबत झाला साखरपुडा; मुंबईत रंगला भव्य सोहळा

Maharashtra Education : मराठी शाळांच्या सहभागाशिवाय 'विकसित महाराष्ट्र २०४७' व्हिजनची अंमलबजावणी कठीण

Kolhapur Circuit Bench Cases : १ लाख ७५ हजार खटले सर्किट बेंचकडे येणार, दोन न्यायाधीशांचे बेंच, जनहित याचिकाही शक्य होणार

रस्त्यावर पहाटे ४ पर्यंत दारूच्या नशेत लोळत पडलेला असायचा अभिनेता; पोलीस पकडायचे आता आहे अफाट श्रीमंत

Latest Marathi News Updates Live : 16 वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलीचं अपहरण करत केला विनयभंग

SCROLL FOR NEXT