कोकण

रत्नागिरीत प्रथमच निघणार कावडयात्रा

CD

-rat२p१६.jpg-
२५N८१६७८
रत्नागिरी : कावडयात्रेच्या बैठकीप्रसंगी बोलताना अॅड. प्रशांत पाध्ये. सोबत दीपक देवल, गजानन करमरकर.
---------
रत्नागिरीत उद्या निघणार कावडयात्रा
सकल हिंदू समाज ; काशीविश्वेश्वर मंदिरात गंगाजल अर्पण करणार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ : सकल हिंदू समाजातर्फे सोमवारी (ता. ४) प्रथमच कावडयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शिवभक्तांसाठी ही पर्वणी ठरणार आहे. कावडयात्रेचे पहिलेच वर्ष असून, यात्रेचे नियोजन व व्यवस्थापनाची पहिली बैठक मारुती मंदिर येथील विवा एक्झिक्युटिव्ह येथे झाली.
या वेळी मरूधर विष्णू समाजाचे दीपक देवल, चुन्नीलाल सोळंकी, नरपत सिंह परिहार, वीरम सिरवी, धनराज चौधरी आदींसह सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. दरवर्षी सकल हिंदू समाजातर्फे हिंदू नववर्ष स्वागतयात्रा, आषाढी एकादशीला आषाढीवारीचे मोठ्या उत्साहात आयोजित करत आहे. त्या निमित्ताने सकल हिंदू समाज एकत्र येत आहे. आता कावडयात्रेच्या निमित्ताने हिंदू बंधू-भगिनींची एकी दृढ होणार आहे.
पवित्र श्रावण महिन्यात शिवशंभोच्या चरणी सर्व शिवभक्तांसाठी कावडयात्रा आयोजित करण्यात येणार आहे. गंगाजल घेऊन भगवान शिवाच्या चरणी अर्पण करण्याची अनोखी संधी म्हणजे कावडयात्रा. खेडशी, स्वामीनगर येथील श्री मरूधर विष्णू समाजभवन येथे एकत्रित होऊन कावडयात्रेला ४ ऑगस्टला सकाळी ७ वाजता सुरुवात होणार आहे. खेडशी, कुवारबाव, साळवीस्टॉप, मारुती मंदिर, जेलनाका, कै. अरूअप्पा जोशी मार्गावरून गोगटे-जोगळेकर महाविद्यालय येथून राजीवडा येथील श्री काशीविश्वेश्वर मंदिर येथे कावडयात्रा पोहोचेल. बम बम भोले- शिवहरी-हर हर महादेवच्या गजरात कावडीमधून आणलेल्या पवित्र जलाने श्री देव काशीविश्वेश्वर मंदिरात महादेवावर अभिषेक करण्यात येणार आहे. यात जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन दीपक देवल, देवेंद्र झापडेकर आणि श्री काशीविश्वेश्वर देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yugendra Pawar Engagement: युगेंद्र पवार एक पाऊल पुढे... तनिष्का सोबत झाला साखरपुडा; मुंबईत रंगला भव्य सोहळा

Maharashtra Education : मराठी शाळांच्या सहभागाशिवाय 'विकसित महाराष्ट्र २०४७' व्हिजनची अंमलबजावणी कठीण

Kolhapur Circuit Bench Cases : १ लाख ७५ हजार खटले सर्किट बेंचकडे येणार, दोन न्यायाधीशांचे बेंच, जनहित याचिकाही शक्य होणार

रस्त्यावर पहाटे ४ पर्यंत दारूच्या नशेत लोळत पडलेला असायचा अभिनेता; पोलीस पकडायचे आता आहे अफाट श्रीमंत

Latest Marathi News Updates Live : सांगलीतील मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थ्यांचं आंदोलन चिघळलं

SCROLL FOR NEXT