कोकण

वीज मीटर सक्तीविरोधात महाविकास आघाडी आक्रमक

CD

-rat२p२८.jpg-
२५N८१७१२
दापोली ः आंदोलनावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करताना महावितरणचे अधिकारी.
---
वीजमीटर सक्तीविरोधात ‘आघाडी’ आक्रमक
महावितरण अधिकाऱ्यांना धरले धारेवर : आंदोलनाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. २ ः तालुक्यात घरगुती ग्राहकांना जबरदस्तीने प्री-पेड वीजमीटर बसवले जात असल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (ता. १) महावितरणच्या दापोली कार्यालयात धडक दिली. मीटर बसवणाऱ्या कंपन्यांकडून जबरदस्ती, धमकी आणि काही बंद घरांमधून विनापरवाना मीटर बसवले जात असल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
ठाकरे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांचे दापोलीतील तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर, मंगेश मोरे आणि सचिन तोडणकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात प्री-पेड मीटर सक्ती नसल्याचे स्पष्ट सांगितले असूनही दापोलीत मीटर बसवले जात आहेत.
महावितरणच्या उपविभाग १चे उपकार्यकारी अभियंता अरविंद कुकडे आणि उपविभाग २चे उपकार्यकारी अभियंता नीलेश बेंडाळे यांना आंदोलनकर्त्यांनी लेखी निवेदन सादर केले. प्री-पेड मीटर सक्ती रद्द करावी, कंपन्यांकडून होणाऱ्या गैरप्रकारांवर कारवाई करावी अन्यथा निर्माण होणाऱ्या असंतोषासाठी महावितरण जबाबदार राहील, असे निवेदनात म्हटले आहे.
शिवसेना तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन तोडणकर यांनी भूमिगत वीजवाहिन्यांमुळे ग्रामपंचायत हद्दीतील रस्ते खराब होत असल्याचे मुद्दे मांडले. रस्त्यांची दुरुस्ती कोण करणार यावर अधिकाऱ्यांकडे ठोस उत्तर नसल्याने ते अडचणीत सापडले.
महावितरणने या मागण्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवण्याचे आश्वासन दिले; मात्र प्री-पेड मीटर सक्ती त्वरित रद्द झाली नाही तर महाविकास आघाडी अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडेल, असा थेट इशारा कार्यकर्त्यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yugendra Pawar Engagement: युगेंद्र पवार एक पाऊल पुढे... तनिष्का सोबत झाला साखरपुडा; मुंबईत रंगला भव्य सोहळा

Maharashtra Education : मराठी शाळांच्या सहभागाशिवाय 'विकसित महाराष्ट्र २०४७' व्हिजनची अंमलबजावणी कठीण

Kolhapur Circuit Bench Cases : १ लाख ७५ हजार खटले सर्किट बेंचकडे येणार, दोन न्यायाधीशांचे बेंच, जनहित याचिकाही शक्य होणार

रस्त्यावर पहाटे ४ पर्यंत दारूच्या नशेत लोळत पडलेला असायचा अभिनेता; पोलीस पकडायचे आता आहे अफाट श्रीमंत

Latest Marathi News Updates Live : सांगलीतील मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थ्यांचं आंदोलन चिघळलं

SCROLL FOR NEXT