कोकण

१ सीएनजी पंप एसटीसाठी आरक्षित

CD

चिपळुणात एक ‘सीएनजी’ एसटीसाठी आरक्षित
आगाराचा प्रस्ताव ; वाहतूककोंडी टाळण्यासाठी उपाय
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २ ः शहरातील शिवाजीनगर बसस्थानक परिसरातील सीएनजी पंपावर सीएनजी भरण्यासाठी वाहने उभी राहिल्यानंतर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूककोंडी होते. मुंबईतून येणारी वाहने सीएनजी भरण्यासाठी येथे उभी केली जातात. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या सीएनजीवर चालणाऱ्या एसटींना सीएनजी मिळत नाही. या समस्येवर पर्याय म्हणून शिवाजीनगर बसस्थानक परिसरातील सीएनजी पंप केवळ महामंडळाच्या एसटीसाठी आरक्षित ठेवण्याचा पर्याय चिपळूण आगाराने काढला आहे.
प्रशासनाने त्याला मंजुरी दिली तर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चिपळूण शहरात होणारी वाहतूक कोंडी टाळता येईल. त्याशिवाय एसटीने येणाऱ्या चाकरमान्यांना वेळेत घर गाठता येईल. गणेशोत्सव काळात सीएनजीवर चालणारी हजारो वाहने कोकणात दाखल होतात. सीएनजीवर चालणारी वाहने एकदा सीएनजी भरल्यानंतर २०० ते २५० किलोमीटरचा प्रवास करतात. त्यामुळे मुंबईतून सीएनजी भरून येणाऱ्या वाहनांचा सीएनजी चिपळूणच्या जवळपास आल्यानंतर संपतो. त्यामुळे ही वाहने सीएनजी भरण्यासाठी चिपळूण परिसरातील पंपावर गर्दी करतात. शिवाजीनगर बसस्थानक परिसरातील सीएनजी पंपावर राज्य परिवहन महामंडळाचे खाते आहे. पंपाची काही जागा एसटीच्या मालकीची आहे. त्यामुळे येथे एसटीला सीएनजी भरण्यासाठी प्राधान्य दिले जाते.
गणेशोत्सव काळात मुंबई, बोरिवली, वसई, ठाणे, विरार, पनवेल, पुणे, बारामतीसह राज्याच्या वेगवेगळ्या भागातून जवळपास पाच हजार एसटीची वाहने कोकणात दाखल होणार आहेत. यातील बहुतांशी वाहने सीएनजीवर चालणारी आहेत. या वाहनांना शिवाजीनगर बसस्थानकातील सीएनजी पंप हे एकमेव आधार आहे; मात्र या ठिकाणी एसटीसह खासगी वाहने सीएनजी भरण्यासाठी उभी केली जातात. त्यामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजूने पाच ते सात किलोमीटरच्या रांगा लागतात. महामार्गाचा सेवारस्ता अरुंद आहे. शिवाजीनगरचा सीएनजी पंप बसस्थानकाला लागून आहे. या ठिकाणी रिक्षा आणि खासगी वाहने रांगेत उभी केल्यानंतर एसटी बसला बसस्थानकात प्रवेश करताना आणि बसस्थानकावरून बाहेर येताना अडचण होते. या सर्व अडचणींवर पर्याय म्हणून शिवाजीनगरचा सीएनजी पंप केवळ एसटीसाठी आरक्षित राहावा, असा पर्याय चिपळूण आगाराने काढला आहे तसा प्रस्ताव आगाराकडून प्रशासनाला देण्यात येणार आहे.

चौकट
शहराजवळचे सीएनजी पंप
लोटे - १
वालोपे - १
चिपळूण शहर - ३

चौकट
सीएनजीवरील रिक्षा - १५००
ग्रामीण भागातून येणाऱ्या रिक्षा - ७००
सीएनजीवरील इतर वाहने - सुमारे १२ हजार
----------
कोट
सर्व सीएनजी पंपधारकांकडून मागणीनुसार सीएनजी मागवला जातो. एका गाडीतून कमीत कमी दोन हजार किलो सीएनजी आणला जातो. पंपावर स्टोरेज क्षमता २ हजार ४०० किलोची असते. एका पंपावर दिवसात कमीत कमी तीन गाड्या आणि जास्तीत जास्त सहा गाड्या संपतात. उत्सव आणि सुट्ट्यांच्या काळात सीएनजीची मागणी जास्त असते. तेव्हा पुरवठा करताना तारांबळ होते.
- सर्फराज महालदार, विक्री अधिकारी, अशोका गॅस, चिपळूण

कोट
केवळ गणेशोत्सव काळात शिवाजीनगर येथील सीएनजी पंप केवळ एसटीसाठी आरक्षित ठेवण्याचा विचार आहे. अंतिम निर्णय नाही. प्रशासनाने याबाबत निर्णय घेतल्यास सर्व अर्थाने चाकरमान्यांची गैरसोय दूर होणार आहे.
- दीपक चव्हाण, आगारप्रमुख, चिपळूण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yugendra Pawar Engagement: युगेंद्र पवार एक पाऊल पुढे... तनिष्का सोबत झाला साखरपुडा; मुंबईत रंगला भव्य सोहळा

Maharashtra Education : मराठी शाळांच्या सहभागाशिवाय 'विकसित महाराष्ट्र २०४७' व्हिजनची अंमलबजावणी कठीण

Kolhapur Circuit Bench Cases : १ लाख ७५ हजार खटले सर्किट बेंचकडे येणार, दोन न्यायाधीशांचे बेंच, जनहित याचिकाही शक्य होणार

रस्त्यावर पहाटे ४ पर्यंत दारूच्या नशेत लोळत पडलेला असायचा अभिनेता; पोलीस पकडायचे आता आहे अफाट श्रीमंत

Latest Marathi News Updates Live : सांगलीतील मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थ्यांचं आंदोलन चिघळलं

SCROLL FOR NEXT