कोकण

रत्नागिरी- रत्नागिरीमध्ये ६ पासून संस्कृत सप्ताह

CD

रत्नागिरीमध्ये ६ ऑगस्टपासून संस्कृत सप्ताह
संस्कृत भारतीतर्फे आयोजन; विविध संस्थांचे सहाय्य
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ : प्रतिवर्षी श्रावण पौर्णिमेला संस्कृत दिन साजरा केला जातो. यावर्षी संस्कृत दिनाचे औचित्य साधून येत्या ६ ते १२ ऑगस्ट दरम्यान रत्नागिरीत संस्कृत सप्ताहाचे आयोजन केले आहे. संस्कृत भारती दक्षिण रत्नागिरी व विविध संस्थांच्या साहाय्याने विविध उपक्रम आयोजित केले आहेत.
सप्ताहाची सुरवात ६ ऑगस्टला रत्नागिरी शहरातील व आजूबाजूच्या गावातील ३५ विद्यालयांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सामूहिक सुभाषित पठण अभियान आयोजित केले आहे. यामध्ये सर्व शाळांमधील विद्यार्थी १० सुभाषितांचे सामूहिक पठण करणार आहेत. ७ रोजी सायंकाळी ४ वाजता कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्रासह प्रश्नमंजूषा आणि संस्कृत दिनाचा कार्यक्रम भारतरत्न डॉ. पां. वा. काणे संस्कृत अध्ययन केंद्रात आयोजित केला आहे.
८ ऑगस्टला सायंकाळी ५ वाजता शेरे नाका येथील राणी लक्ष्मीबाई सभागृहात ‘स्तोत्रकाव्यांजली’ हा कार्यक्रम स्वानंद पठण मंडळासह आयोजित केला आहे. ९ ऑगस्टला म्हणजे संस्कृत दिनाच्या दिवशी रत्नागिरी सायकलिस्ट क्लब यांच्या संस्कृत बोधवाक्याचे अनावरण व त्यानिमित्ताने संस्कृत प्रचाराचा कार्यक्रम होणार आहे. १० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता संस्कृत भारतीचे प्रांतमंत्री नीरज दांडेकर यांचे ऑनलाईन व्याख्यान होईल. त्याच दिवशी सकाळी दहा वाजल्यापासून भारतीय संस्कृती ज्ञान परीक्षा ऑनलाईन माध्यमातून घेण्यात येणार आहे. भारतीय संस्कृती व संस्कृत भाषेविषयी ही परीक्षा असणार आहे. सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सप्ताहात ११ ऑगस्टला सकाळी ११ वाजता गोगटे- जोगळेकर महाविद्यालयात संस्कृत विभागासह संस्कृत दिनाचा कार्यक्रम होईल. या विविधांगी कार्यक्रमांमध्ये सर्व संस्कृतप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन संस्कृतभारतीच्या वतीने केले आहे.

चौकट
प्रथमच अष्टावधानकला
येत्या १२ ऑगस्टला भारतीय ज्ञान परंपरेतील प्रसिद्ध असा ‘अष्टावधानकला’ हा अनोखा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये बंगळुरू येथील अष्टावधानी विद्वान डॉ. उमामहेश्वर ना. हे ‘अष्टावधानकला’ सादर करणार आहेत. यात गोवा व मुंबई येथील विविध विद्वान व्यक्ती सहभागी होणार आहेत. झाडगाव येथील माधवराव मुळ्ये भवनातील वैद्य सभागृहात सायंकाळी ४ ते ७ या वेळेत हा कार्यक्रम होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवरात्रीत महाराष्ट्रातील मांसविक्रीची दुकाने बंद राहणार? शिंदेसेनेच्या बड्या नेत्याच्या सूचक वक्तव्यानं चर्चा, काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update : पोहनेर, दिग्रस, बोरखेड, तेलसमुख, ममदापूर या गावांचा संपर्क तुटला

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार: शाहरुख, विक्रांत आणि राणी मुखर्जीला पुरस्कार प्रदान; मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मान

Jalna News : गावाला पुराचा वेढा, रस्ते बंद, आजारी नातवाने उपचाराअभावी आजीच्या खांद्यावरच सोडले प्राण; हृदयद्रावक घटनेने सर्वत्र हळहळ

Tendulkar vs Dravid: 4, 0, W... तेंडुलकर-द्रविडची नवी पिढी आमने-सामने; अर्जुनने तीनच चेंडूत समितला केलं आऊट

SCROLL FOR NEXT