कोकण

लिंगेश्वर पावणाई भजन मंडळ प्रथम

CD

81849

लिंगेश्वर पावणाई भजन मंडळ प्रथम

तळवडेतील स्पर्धा; प्रकाश परब फाउंडेशनच्या उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३ : तळवडे येथे नुकत्याच झालेल्या श्रावणमास चक्रीय नॉनस्टॉप भजन स्पर्धेत लिंगेश्वर पावणाई देवी भजन मंडळ कणकवली यांनी प्रथम क्रमांक पटकावून स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. या स्पर्धेत जिल्हाभरातील भजन मंडळांनी सहभाग घेतला. (कै.) प्रकाश परब यांच्या स्मरणार्थ आमदार दीपक केसरकर पुरस्कृत तसेच शिवसेना तळवडे आणि प्रकाश परब फाउंडेशनतर्फे या स्पर्धेचे आयोजन केले होते.
स्पर्धेत द्वितीय क्रमांक महापुरुष प्रसादिक भजन मंडळ पिंगुळी, तृतीय क्रमांक सिद्धिविनायक प्रासादिक भजन मंडळ कणकवली, चतुर्थ क्रमांक सद्गुरू प्रासादिक भजन मंडळ कुडाळ यांनी पटकावला. कलेश्वर पूर्वीदेवी प्रासादिक भजन मंडळ वेत्ये यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. स्पर्धेत वैयक्तिक कलाकारांनाही त्यांच्या कामगिरीबद्दल विशेष पारितोषिके देऊन गौरविले. यात उत्कृष्ट हार्मोनियम वादक प्रथमेश निगुडकर (कलेश्वर पूर्वीदेवी प्रासादिक भजन मंडळ, वेत्ये), उत्कृष्ट झांज वादक म्हणून श्री. अनिकेत पाटकर (कलेश्वर पूर्वीदेवी प्रासादिक भजन मंडळ, वेत्ये), उत्कृष्ट तबला वादक प्रथमेश नाईक (लिंगेश्वर पावणाई, कणकवली), उत्कृष्ट पखवाज वादक तुषार लोट (सिद्धिविनायक, कणकवली), उत्कृष्ट गायक प्रसाद आमडोसकर (महापुरुष प्रासादिक भजन मंडळ), उत्कृष्ट कोरस वैभव सावंत (सद्गुरू संगीत प्रासादिक भजन मंडळ, कुडाळ) यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी प्रकाश परब फाउंडेशनचे अध्यक्ष सूरज परब यांच्यासह महेश परब, रोहित परब, बाळू कांडरकर, रमाकांत परब, सोमनाथ रेडकर, मेहल कांडरकर, ओंकार नाईक, नीतेश परब, रोहन परब, बबन काळे, सदाशिव परब, शत्तम सावंत आदी उपस्थित होते. प्रसाद आडेलकर यांनी सूत्रसंचालन केले. रुपेंद्र परब, रुपेश पवार यांनी परीक्षण केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT