कोकण

परुळेबाजारला ‘काथ्याचे गाव’ बनवू

CD

81848

परुळेबाजारला ‘काथ्याचे गाव’ बनवू

जे. पी. डांगे ः येसुआका काथ्या प्रकल्पाची पाहणी

सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. ३ ः परुळेबाजार ग्रामपंचायतीने विकासात घेतलेली आघाडी कौतुकास्पद आहे. येथील काथ्या प्रकल्प गावासाठी विकासाची दिशादर्शक ठरेल. परुळेबाजारची ‘काथ्याचे गाव’ ही ओळख बनविण्यासाठी प्रयत्न करू, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य विकास महामंडळ मर्या.,चे संचालक जे. पी. डांगे, (निवृत्त आयएएस, माजी मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन) यांनी केले.
श्री. डांगे यांनी नुकतीच परुळेबाजार ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील येसुआका महिला काथ्या युनिटला भेट दिली व माहिती घेतली. परुळे येथे चांदा ते बांदा योजनेंतर्गत महिला बचतगट समुहाच्या महिलांमार्फत काथ्या युनिट सुरू आहे. येथे चांगल्या प्रकारे प्रक्रिया युनिट सुरू आहे. या प्रकल्पाला डांगे यांनी नुकतीच भेट देऊन पाहणी केले. त्यावेळी ते बोलत होते.
कुडाळ येथे डांगे यांच्या अध्यक्षतेखाली ‘महाराष्ट्र काथ्या धोरण’ विषयावर होणाऱ्या बैठकीसाठी अधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी परुळे येथे भेट दिली. त्यांच्या सोबत प्रभारी अधिकारी श्री. गायकवाड, शंकर सावंत, परुळेबाजार ग्रामपंचायत माजी सरपंच तथा सदस्य प्रदीप प्रभू, सुनाद राऊळ, प्रशिक्षक राजाराम राऊळ, रुची राऊळ आदी उपस्थित होते.
कुडाळ येथील बैठकीत महाराष्ट्र काथ्या धोरण तयार करण्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी श्री. डांगे यांच्यासह के. व्ही. गायकवाड (सहाय्यक व्यवस्थापक, एमएसएसआयडीसी, मुंबई), आर. कळकुटकी (प्रभारी अधिकारी, महाकॉयर, सिंधुदुर्ग), शंकर सावंत (कॉयर प्रकल्प अधिकारी, सिंधुदुर्ग) आदी उपस्थित होते. यावेळी परुळे गाव काथ्याचा गाव करण्याबाबत विचार आला. काथ्या उद्योग चालना उद्योगांना भेट देत समस्या जाणून घेण्यात आल्या. पर्यावरणपूरक नैसर्गिक संसाधनवर आधारित मुबलक प्रमाणात कच्चा माल (सोडणे) उपलब्ध करून देण्याबाबत आढावा घेण्यात आला. कोकोपोठ, दोरी, पायपुसणी, हस्तकलेच्या वस्तू, गार्डन आर्टिकल यांना मोठी मागणी आहे. जिल्ह्यामध्ये उद्योग सुरू करण्यास प्रचंड वाव आहे, असे मत डांगे यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT