कोकण

रत्नागिरी- आगाशे विद्यामंदिरात वक्तृत्व, निबंध स्पर्धा

CD

81800

प्रविण सुतार, ज्ञानेश काळे प्रथम
वक्तृत्व स्पर्धा; आगाशे विद्यामंदिरमध्ये टिळक पुण्यतिथी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ : येथील कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरात लोकमान्य टिळकांना पुण्यतिथीनिमित्त पहिली ते चौथीच्या बारा वर्गांमध्ये बालसभेचे आयोजन केले होते. यावेळी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. त्यात पहिली व दुसरीच्या गटात सारजा प्रविण सुतार तिसरी व चौथीच्या गटात ज्ञानेश शैलेश काळे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
पुण्यतिथीनिमित्त टिळकांच्या प्रतिमेला मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम यांनी पुष्पहार अर्पण केला. या वेळी सर्व शिक्षिका-शिक्षक उपस्थित होते. ओम राम कृष्ण हरी जप, त्यानंतर लोकमान्य टिळकांचे पद्य सादर करण्यात आले. वर्गावर्गात निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. प्रत्येक वर्गात लोकमान्य टिळकांच्या वेशभूषेत एकेक विद्यार्थी आले होते. बालसभेचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी केले.
इयत्ता पहिलीच्या वर्गात शलाका रेडिज, सुरेखा दाते, भक्ती वणजू, इयत्ता दुसरीच्या वर्गात यश सोवनी, मयुरेश पाटील, कविता मुळ्ये, इयत्ता तिसरीच्या वर्गात स्वप्नगंधा नाईक, तनया दळवी, अपर्णा गोगटे, इयत्ता चौथीच्या वर्गात आभा घाणेकर, प्रमोदिनी शेट्ये व पूनम हट्टीकर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते विजेत्यांना गौरवण्यात आले. रत्नागिरी नगरपालिकेच्यावतीने लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त शाळा पातळीवर आयोजित वक्तृत्व स्पर्धेत आगाशे विद्यामंदिरच्या सहा विद्यार्थ्यांनी सुयश मिळवले.
यामध्ये इयत्ता पहिली व दुसरीच्या गटात सारजा प्रविण सुतार (प्रथम), अनुष्का नीलेश नानिवडेकर (द्वितीय) आणि स्वानंद सिद्धेश देशमुख (तृतीय), इयत्ता तिसरी व चौथीच्या गटात ज्ञानेश शैलेश काळे (प्रथम), स्वरा सूरज शेट्ये (द्वितीय) आणि सार्थक संदीप ढवळ (तृतीय) यांनी यश मिळवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palghar Accident: पोलिसांना घाबरून पळाले अन् ट्रॅकवर गेले, समोरून आलेल्या मालगाडीनं उडवलं; तिघांचा मृत्यू

नवीन कर्णधार? वैभव सूर्यवंशीची संघात एन्ट्री! LA Olympics अन् ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२८ साठी कसा असेल भारताचा संघ? बरेच पर्याय उपलब्ध

Naman Awards 2026: स्मृती मानधना सलग ५ व्यांदा ठरली सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू; BCCI ने जाहीर केली पुरस्कारांची यादी

हम साथ साथ है फेम अभिनेत्रीचा सख्ख्या बहिणीनेच केला विश्वासघात ! नवरा तर पळवलाच पण संपत्तीही हडपली

सोनम वांगचुक यांची सुटका होणार, गृहमंत्रालयाकडून आदेश जारी; 'रासुका'वरही केंद्राचा युटर्न

SCROLL FOR NEXT