कोकण

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे उपोषणाची वेळ

CD

81907

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे उपोषणाची वेळ

ग्राहक संघटना; स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ८ ः गणेशोत्सव पार्श्वभूमीवर महावितरणच्या निष्क्रिय आणि असंवेदनशील कारभाराविरोधात सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना आक्रमक झाली आहे. यापूर्वी वेळोवेळी निवेदने देऊन प्रत्यक्ष भेटी घेऊन आणि लाक्षणिक उपोषण करूनही प्रशासनाने आणि महावितरणने ग्राहकांच्या समस्यांची दखल घेतली नाही. त्यामुळे आता अखेर वीज ग्राहक संघटनेने स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो वीज ग्राहकांच्या पाठिंब्यावर लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्धार केला आहे. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळेच उपोषणाची वेळ आली असून याला पूर्णपणे जिल्हा प्रशासन आणि महावितरण जबाबदार असेल, असा गंभीर इशाराही संघटनेने दिला आहे.
जिल्हा वीज ग्राहक संघटना तीन वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ आणि महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटनेच्या मार्गदर्शनाखाली स्थापन केली. जिल्ह्यातील एकूण ३ लाख ५९ हजार २२३ वीज ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी ही संघटना सातत्याने प्रयत्नशील आहे. मात्र, तीन वर्षांपासून वारंवार निवेदने देऊनही आणि २६ जानेवारी २०२४ ला अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर एक दिवसीय उपोषण करूनही ग्राहकांच्या समस्यांमध्ये फरक पडला नाही. जिल्ह्यातील महावितरण प्रणालीची दुर्दशा आणि महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा उदासीन दृष्टिकोन यामुळे ग्राहकांना प्रचंड आर्थिक, मानसिक आणि शारीरिक मनस्ताप सहन करावा लागत आहे. जिल्ह्यात कार्यरत असलेले कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता, सहाय्यक अभियंता यांच्या चुकीच्या कारभारामुळे वीज ग्राहकांना प्रचंड त्रास होत आहे. वीज पुरवठ्यातील अनियमितता, वारंवार होणारे बिघाड, वाढीव वीज बिले, स्मार्ट मीटर बसवण्यासारख्या विवादास्पद निर्णयामुळे ग्राहक त्रस्त आहेत. यापूर्वी हजारो ग्राहकांनी वैयक्तिक तक्रारी नोंदवल्या असूनही, महावितरण कोणत्याही ग्राहकाचे समाधान करू शकलेले नाही. संघटनेने यापूर्वी सीएमडी महावितरण मुंबई, मुख्य अभियंता रत्नागिरी तसेच केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची प्रत्यक्ष भेट घेऊनही वीज ग्राहकांना कोणताही दिलासा मिळालेला नाही.
वीज ग्राहक संघटनेने प्रशासनाला एक निवेदन दिले होते. त्यात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने वितरण संचालक, मुख्य अभियंता रत्नागिरी आणि जिल्हा संघटनेचे प्रमुख प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेऊन ग्राहकांच्या समस्यांवर तोडगा काढण्याची मागणी केली होती. ही बैठक सात दिवसांच्या आत आयोजित करण्याची विनंती केली होती. मात्र, अद्यापही या संदर्भात कुठलीही बैठक आयोजित केलेली नाही. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळेच संघटना संतप्त झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज येथे झालेल्या जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या पत्रकार परिषदेत १५ ऑगस्टला होणाऱ्या उपोषणाचा निर्णय घेण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष संजय लाड, जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर, समीर शिंदे, बाळासाहेब बोर्डेकर, जिल्हा सचिव दीपक पटेकर मनोज घाटकर, म्हापसेकर आदी उपस्थित होते.
--------------
गणेशोत्सवात काय स्थिती असेल?
गणेशोत्सव अगदी तोंडावर येऊन ठेपला आहे. या सणासुदीच्या काळात अखंड वीजपुरवठा आवश्यक असतो. मात्र, महावितरणने पावसाळ्याआधी वीज वाहिनी आणि विद्युत प्रणालीची देखभाल व दुरुस्तीची कामे वेळेवर केलेली नाहीत. यामुळे जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींमधील सुमारे साडेआठ लाख नागरिकांना वारंवार अंधारात राहावे लागत आहे. १९ मे २०२५ ला आलेल्या अवकाळी पावसानंतर सिंधुदुर्गातील जनता अक्षरशः आठ ते दहा दिवस सातत्याने काळोखात होती. याला संपूर्ण जबाबदार महावितरण सिंधुदुर्ग आहे. या अनुभवामुळे गणेशोत्सवात वीज पुरवठ्याची काय स्थिती असेल, याची चिंता ग्राहकांना सतावत आहे.
-----------------
जिल्ह्यात बसविले ४० हजार स्मार्ट मीटर
जिल्हा सचिव पटेकर यांनी या आंदोलनात केवळ वीज पुरवठ्याच्या समस्याच नव्हे, तर स्मार्ट मीटरचा मुद्दाही केंद्रस्थानी आहे. स्मार्ट मीटरच्या विरोधात संघटनेचा लढा सुरूच राहणार आहे. जिल्ह्यात सुमारे ४० हजार स्मार्ट मीटर लावले आहेत. यामध्ये कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ले आणि दोडामार्ग तालुक्यात १५ तर कणकवली विभागात २५ हजार स्मार्ट मीटरचा समावेश आहे. सावंतवाडी शहरातच एक हजार स्मार्ट मीटर बसविल्याचे सांगितले.
-------------------
जिल्हावासीयांनो सावध व्हा!
जिल्हावासीयांनी आताच सावध व्हावे. १५ ऑगस्टला होणाऱ्या उपोषणादरम्यान, ज्या ग्राहकांना स्मार्ट मीटरच्या संदर्भात समस्या आहेत, त्यांनी लेखी स्वरूपात आपल्या तक्रारी मांडाव्यात. स्मार्ट मीटरमुळे होणारे संभाव्य आर्थिक नुकसान, डेटा सुरक्षिततेचा प्रश्न आणि तांत्रिक समस्यांवर संघटनेने यापूर्वीच आवाज उठवला आहे, असेही यावेळी पटेकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झोपलेले गृहमंत्री जागे होतील अशी अपेक्षा, रोहित पवारांनी व्यक्त केला संताप; मध्यरात्री ३ वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात

ENG vs IND: जो रुट भारतासाठी ठरलाय डोकेदुखी! ३९ वे कसोटी शतक ठोकत केलेत कोणालाच न जमलेले पराक्रम

Mahadevi Elephant : माधुरी हत्तीण कोल्हापूरला परत मिळणार का? कोणत्या कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागणार? वाचा...

धक्कादायक! 'साेलापुरमध्ये तरुणाने व्हिडिओ पाठवून जीवन संपवले'; दोनच महिन्यापूर्वी विवाह, भलतचं कारण आलं समाेर..

पुणे पोलिसांकडून तरुणींना मारहाण, शिवीगाळ; गुन्हा नोंदवता येणार नाही, पोलिसांचं पत्र

SCROLL FOR NEXT