कोकण

साहित्‍याच्या माध्यमातून परिवर्तनाची मशाल

CD

81936

साहित्‍याच्या माध्यमातून परिवर्तनाची मशाल

डॉ.महेश केळुसकर ः कणकवलीत ‘कविता वर्षावासाच्या’ कार्यक्रम

कणकवली, ता. ३ : सामाजिक परिवर्तनाची मशाल साहित्याच्या माध्यमातून पेटवण्याचा स्तुत्य उपक्रम सम्यक साहित्य संसद संस्थेने हाती घेतला असून, संस्थेच्या वतीने आयोजित ‘कविता वर्षावासाच्या... कविता परिवर्तनाच्या’ या साहित्यिक कार्यक्रमात जुने-नवे कवी आणि रसिक यांच्यात सृजनशील संवाद घडताना दिसून आला प्रतिपादन ज्येष्ठ कवी, कादंबरीकार, लोककला अभ्यासक डॉ. महेश केळुसकर यांनी येथे व्यक्‍त केले.
सम्‍यक साहित्‍य संसद संस्थेतर्फे कणकवली महाविद्यालयाच्या एचपीसीएल हॉलमध्ये ‘कविता वर्षावासाच्या... कविता परिवर्तनाच्या’ हा कार्यक्रम झाला. याचे उद्‌घाटन डॉ.महेश केळुसकर यांच्याहस्ते झाले. यावेळी सम्यक साहित्य संसद संस्थेचे अध्यक्ष अभियंते अनिल जाधव, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवी प्रा. प्रवीण बांदेकर, कार्यवाह राजेश कदम, कोषाध्यक्ष संध्या तांबे, सिद्धार्थ तांबे, प्रा. राजेंद्र मुंबरकर हे मान्यवर उपस्थित होते.
प्रा. प्रवीण बांदेकर यांनी सिंधुदुर्गातील साहित्य चळवळीच्या प्रवासावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, ‘‘वसंत सावंत यांनी सिंधुदुर्गात साहित्याचे बीज रोवले आणि त्या बीजाचा वटवृक्ष आज बहरलेला दिसतो आहे. मी आणि केळुसकर सर हे या साहित्य प्रवाहाचे साक्षीदार आहोत. गेली ३५ वर्षे मी या चळवळीत कार्यरत आहे. सम्यक साहित्य संसदने जो उपक्रम राबवला आहे तो केवळ पावसाच्या कवितांचा नाही तर परिवर्तनाच्या चळवळीचाही जागर आहे.’’
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीचा उल्लेख करत श्री.बांदेकर म्‍हणाले की, ‘‘आंबेडकरांचे विचार हे परिवर्तनवादी साहित्यिकांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहिले आहेत. आबा शेवरे यांनी आपल्या कवितांमधून हे विचार प्रभावीपणे मांडले आहेत.’’ सम्यक साहित्य संसदची परिवर्तनाची आस या उपक्रमामध्ये दिसून आली, असेही त्यांनी नमूद केले. सिद्धार्थ तांबे यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून सम्यक साहित्य संसद संस्थेच्या कार्याचा परिचय करून दिला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक आबा शेवरे यांच्या कवितासंग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. सुनील तांबे यांच्या पुस्तकाचाही प्रकाशन सोहळा झाला. संदेश तांबे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meghna Bordikar: 'महायुतीच्या नेत्यांचा वाचाळपणा सुरूच'; कोकाटे यांच्यानंतर मेघना बोर्डीकर यांचे वादग्रस्त वक्तव्य

शाळेत भांडण, १५ वर्षे एक शब्दही बोलणं नाही पण आता दोघे नवरा-बायको; फ्रेंडशिप डेची पोस्ट होतेय व्हायरल

Ganeshotsav 2025: गणरायाच्या आगमनासाठी वाहतूक नियोजन हवेच! पोलीस आयुक्तांकडे मागणी

Ladakh Youth: 'लडाखमधील तरुणांना दिसतेय ताऱ्यांत भविष्य'; आकाश निरीक्षणातून उदरनिर्वाह, खगोलप्रेमींमध्येही आकर्षण

Shirala Robbery: शिराळा येथे भरदिवसा ८ लाख ८८ हजारांची चोरी; चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड पळवली..

SCROLL FOR NEXT