कोकण

विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची सुविधा

CD

81947

विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची सुविधा

विशेष मोबाईल ॲप; बांदा रोटरी क्लबचा पुढाकार

बांदा, ता. ३ ः येथील रोटरी क्लबतर्फे खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल तसेच नाबर स्कूल, बांदा येथील दहावीच्या विद्यार्थ्यांना नुकतेच परीक्षेची तयारी अधिक परिणामकारक करण्यासाठी विशेष मोबाईल ॲप वितरित करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना परीक्षेची भीती वाटू नये, अभ्यास सुलभ व सोप्या भाषेत समजावा आणि गावातील विद्यार्थ्यांनाही डिजिटल शिक्षणाची सुविधा मिळावी, असा आहे.
या ॲपमध्ये व्हिडिओ लेक्चर्स, नोट्स, सराव पेपर्स, क्विझ आदी सुविधा असून मुलांना घरबसल्या शंका निरसन करण्यास मदत होणार आहे. या कार्यक्रमात रोटरी क्लब ऑफ बांदाचे अध्यक्ष शिवानंद भिडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘‘आजच्या काळात डिजिटल शिक्षण खूप महत्त्वाचे आहे. या ॲपमुळे तुम्हाला अभ्यासात सातत्य ठेवता येईल. परीक्षेची भीती दूर करायची असेल तर रोजचा अभ्यास, शंका निरसन आणि वेळेचे योग्य नियोजन करा.’’ संस्थापक अध्यक्ष मंदार कल्याणकर यांनी, दहावीचे वर्ष हे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. हे ॲप तुम्हाला परीक्षा तयारीसाठी योग्य दिशा दाखवेल. यातले सराव पेपर्स, नोट्स, प्रश्नोत्तर या सगळ्याचा नियमित वापर करा. मोठी स्वप्ने बाळगा आणि मेहनतीने पुढे जा. यश नक्कीच मिळेल, असे सांगितले. यावेळी सचिन स्वप्नील धामापूरकर, माजी अध्यक्ष सीताराम गावडे, दिगंबर गायतोंडे, बाबा काणेकर, मनसुख वाखाणी, अण्णा आळवे, विराज परब, रवी गवस, साईराज साळगावकर, अनंत नाडकर्णी, रत्नाकर आगलावे, फिरोज खान, योगेश परुळेकर, संजय शिरोडकर, दादा पावसकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Tourists in Uttarakhand Video : मोठी बातमी! उत्तराखंडमधील महासंकटात अडकले महाराष्ट्रातील दहा पर्यटक

Uttarkashi Cloudburst Latest Update : उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे हाहाकार! ५० पेक्षा अधिक नागरिक बेपत्ता, १० भारतीय लष्काराच्या जवानांचाही समावेश...

Latest Maharashtra News Updates Live : देश विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Best Employees Morcha: बेस्ट सेवानिवृत्त कामगारांचा आझाद मैदानात मोर्चा, काय आहेत मागण्या?

Ganeshotsav: कृत्रिम तलावांची संख्या वाढणार, पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मनपाची तयारी

SCROLL FOR NEXT