कोकण

संगमेश्वर-कलांगणच्या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत श्रेया मेस्त्री प्रथम

CD

कलांगणच्या तालुकास्तरीय
वक्तृत्व स्पर्धेत मेस्त्री प्रथम
संगमेश्वर, ता. ३ ः कलांगण संगमेश्वरतर्फे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा बुरंबी येथील दादासाहेब सरफरे विद्यालयात झाली. त्यामध्ये १३ शाळांतील १९ स्पर्धकांनी सहभाग घेतला.
देवरुख महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. वर्षा फाटक आणि संगमेश्वरी बोली फेम विद्यार्थिप्रिय शिक्षक आनंद बोंद्रे यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. बक्षीस वितरणाला स्पर्धेच्या समन्वयक, सुप्रसिद्ध अभिनेत्री सौ. संपदा जोगळेकर-कुळकर्णी, सौभाग्य अलंकारचे यशवंत सैतवडेकर, बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजाराम गर्दे, सचिव शरद बाईत, मुख्याध्यापक प्रकाश वीरकर, कलांगणचे अध्यक्ष अमोल लोध आदी उपस्थित होते. देवरूख न्यू इंग्लिश स्कूलच्या श्रेया मेस्त्रीने प्रथम, दादासाहेब सरफरे विद्यालयाच्या अनन्या डोळसने द्वितीय, ठाकरे विद्यालयाच्या माही वनकरने तृतीय क्रमांक प्राप्त केला. विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह, पुस्तके आणि रोख रक्कम देण्यात आली. यावर्षी प्रथमच प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्याचे मार्गदर्शक शिक्षक देवरुख हायस्कूलचे मंगेश रसाळ यांना रोख रक्कम आणि प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. सर्व सहभागी आणि विजेत्या स्पर्धकांना प्रशस्तिपत्र देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT