- rat४p३.jpg-
२५N८२०२९
संगमेश्वर ः आंबव येथील सामूहिक लावणी स्पर्धेतील एक क्षण.
आंबव येथे सामूहिक लावणी स्पर्धेचा थरार
शंभरहून अधिक बैलजोड्या ; आराध्या किंजळकर, संदीप सुताराची बैलजोडी प्रथम
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ४ ः तालुक्यातील आंबवपोंक्षे येथे घेण्यात आलेल्या सामूहिक नांगरणी स्पर्धेत चांगलाच थरार रंगलेला होता. यामध्ये एकावेळी एकच बैलजोडी धावली. प्रथम नांगरणी केली आणि नंतर स्पर्धेचा थरार रंगला. यामध्ये घाटी जोड्यांमध्ये आराध्या किंजळकर (बुरंबाड) आणि गावठी गटामध्ये संदीप सुतार (आंबव) यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
सामूहिक नांगरणी व भातलावणी कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते झाले. तालुक्यातील सरंद येथे प्रथम सामूहिक भातलावणी आणि चिखल स्पर्धेला सुरुवात झाली. ११ वर्षानंतर प्रथमच एकाच वेळी अनेक बैलजोड्या या स्पर्धेत सहभागी झालेल्या होत्या. कमी वेळात अंतर कापण्यासाठी बैलजोड्यांमध्ये चुरस होती. या कार्यक्रमाला आमदार शेखर निकम, उद्योजक अजित मोहिते, कृषी बाजार समितीचे अध्यक्ष बाळू ढवळे, अक्षय चव्हाण, सुशील भायजे, नितीन भोसले, पंकज पुसाळकर, प्रफुल्ल भुवड, राहुल धामापूरकर, आदी ग्रामस्थ उपस्थित होते. सामूहिक चिखलणी स्पर्थेत घाटी गटात आराध्या किंजळकर (बुरंबाड), संजय वामन सावंत (पाली), सुजल संदीप पिलणकर (आरवली), राहुल बोल्ये (आंबव), संदीप बाळू सुतार (आंबव), देवजी भायजे (आंबव), श्री मानोबा (माखजन) यांची पहिल्या दहामध्ये नोंद झाली. तर गावठी गटामध्ये संदीप सुतार(आंबव), संबा काटोकारी (मार्लेश्वर), संजय लांडगे, भैरी चंडिका प्रसन्न (शिरवली), गणेश सुनील येलोंडे (तुरळ), मन्या देसाई (तुरळ), जय संबा (पाटगाव), महाकाली प्रसन्न (कुंभार्ली), जयदेव धामणाक (कडवई), गंगोबा प्रसन्न (निवे) यांच्या बैलजोड्या पहिल्या दहामध्ये नोंदल्या गेल्या आहेत.
कोट
भातशेतीचे क्षेत्र झपाट्याने कमी होऊन शेती ओस पडू लागली आहे. हे विदारक चित्र बदलण्याचा प्रयत्न शेतीची आस असणाऱ्या काही जणांनी चालविला आहे. शेती सोडून देणाऱ्या शेतकऱ्यांबरोबरच मुंबईकडे जाणाऱ्या तरुणांना शेतीकडे वळविण्याच्या प्रयत्नातूनच नांगरणी आणि भातलावणीची स्पर्धा तरुणांना प्रेरणादायी ठरेल.
- शेखर निकम, आमदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.