कोकण

प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे ‘झाराप’ दुर्लक्षित

CD

82042

प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे ‘झाराप’ दुर्लक्षित

ग्रामस्थांचा आरोप; विविध मागण्यांचे रेल्वे अधिकाऱ्यांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ४ ः झाराप रेल्वे स्थानकावर दादर-सावंतवाडी रेल्वेला थांबा द्यावा. तसेच या स्थानकाकडे कारशेड सेवा सुरू करावी, अशी मागणी झाराप पंचक्रोशीसह माणगाव खोऱ्यातील प्रवाशांतर्फे झाराप येथील युवा कार्यकर्ते रुपेश बिडये, माजी सरपंच स्वाती तेंडोलकर, सामाजिक कार्यकर्ते राजू तेंडोलकर यांनी कोकण रेल्वेच्या स्थानिक अधिकाऱ्यांच्या पथकाकडे निवेदनाद्वारे केली. झाराप रेल्वे स्थानक दुर्लक्षित राहण्यामागे रेल्वे प्रशासन जबाबदार आहे, असा आरोपही त्यांनी केला.
झाराप रेल्वेस्थानकाला कोकण रेल्वेच्या स्थानिक अधिकाऱ्यांच्या पथकाने भेट दिली. झाराप पंचक्रोशीतील प्रवाशांनी या पथकातील अधिकाऱ्याकडे समस्या मांडल्या. कोकण रेल्वेचे कमर्शियल सुपरवायझर मधुकर मातोंडकर, सेक्शन इंजिनिअर जी. पी. प्रकाश, एरीया सुपरवायझर विजय सामंत, इलेक्ट्रिकल इंजिनिअर चिन्मय भंडारे आदींचा या पथकात समावेश होता. त्यांनी श्री. बिडये, श्री. तेंडोलकर, माजी सरपंच तेंडोलकर यांच्यासह स्थानिक प्रवाशांकडून समस्या जाणून घेतल्या. झारापला लागूनच असलेल्या माणगाव खोऱ्यामध्ये ३५ गावं असून त्या भागातील लोकसंख्या मोठी आहे. झाराप रेल्वे स्थानकाकडूनच आडेली मार्गे वेंगुर्ले मुख्य रस्ता जातो. वेंगुर्ले तालुक्यातील आडेली, मठ, वेंगुर्ले शहर तसेच सावंतवाडी तालुक्यातील नेमळे व लगतच्या गावांपासून हे रेल्वे स्थानक कमी अंतरावर आहे. तसेच तेरसेबांबर्डे, बिबवणे, भोयीचे केरवडे, मांडकुली, साळगाव, हुमरस, आकेरी या पंचक्रोशीतील प्रवाशांनाही जवळचे स्थानक आहे. या भागातील रेल्वे प्रवाशाची संख्या पाहता या स्थानकावर दादर-सावंतवाडी रेल्वे सेवा सुरू करावी. ही सेवा सुरू झाल्यास झाराप पंचक्रोशीसह माणगाव खोरे आणि वेंगुर्ले व सावंतवाडी तालुक्यातील काही गावांतील प्रवाशांना होणारा त्रास कमी होणार आहे, अशी मागणी रेल्वे अधिकाऱ्यांच्या पथकाकडे केली. या स्थानकाकडे कारशेड व्हावी, अशीही मागणी केली. याबाबत निवेदनही दिले. दरम्यान, या रेल्वे स्थानकाला भेट देऊन येथील समस्या जाणून घेतल्याबद्दल रेल्वे अधिकाऱ्यांचे उपस्थितांनी आभार मानले. रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या दृष्टीने आवश्यक सुविधांकडे त्यांचे लक्ष वेधले. आमच्या मागण्या लवकर पूर्ण होण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न करावेत, अशी मागणीही केली.
---
जागा असूनही दुर्लक्ष का?
झाराप रेल्वे स्थानकाकडे खताची रॅक मंजूर आहे. मात्र, कोकण रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षेमुळे ती रत्नागिरी येथे सुरू केली आहे, याकडेही लक्ष वेधले. रॅक सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कार्यवाही करावी. या स्थानकाकडे सोयी सुविधा उभारण्यासाठी मुबलक प्रमाणात जागा उपलब्ध आहे. मात्र, हे स्थानक दुर्लक्षित राहिले आहे. याला रेल्वेप्रशासन जबाबदार आहे, असा आरोप झाराप पंचक्रोशीतर्फे करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात घसरण सुरूच! मात्र LPG गॅस टंचाईमुळे हे शेअर्स आजही तेजीत

Summer Skincare Home Remedies: चेहऱ्यावरची चमक हरवलीय? उन्हाळ्यात त्वचा उजळवण्यासाठी करा ‘हे’ 7 सोपे घरगुती उपाय

Rahul Dravid: ‘द वॉल' राहुल द्रविड यांना जीवनगौरव पुरस्कार; बीसीसीआयच्या वार्षिक सोहळ्यात विश्वविजेत्या संघांचाही गौरव होणार

Shivaji University : ठरलं! शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीचा क्लायमॅक्स जवळ; पाहा मुलाखतीसाठी कुणा-कुणाची नावे शॉर्टलिस्ट? 115 अर्ज, पण संधी फक्त 25 जणांना

LPG Price Hike:सिलिंडरच्या दरवाढीमुळे सामान्यांना फटका! घरगुती सिलिंडर ६० तर व्यावसायिक सिलिंडर ११४ रुपयांनी महाग; आर्थिक गणित बिघडलं..

SCROLL FOR NEXT