कोकण

ॲड. पारिजात पांडे यांनी केली पाहणी

CD

- rat४p९.jpg-
२५N८२०६७
मंडणगड: अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेचे मार्गदर्शक ॲड. पारिजात पांडे यांचे स्वागत करताना अप्पासाहेब मोरे, ॲड, मिलीद लोखंडे, प्राचार्य डॉ. वाल्मीक परहर व अन्य.
---
ॲड पांडे यांनी मंडणगडातील
न्यायालयाच्या इमारतीची पाहणी
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ४ ः मंडणगड येथील कनिष्ठ न्यायालयाच्या नवीन इमारतीचे उद्‍घाटन अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेचे मार्गदर्शक आणि महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष ॲड. पारिजात पांडे यांनी नुकताच मंडणगड तालुक्याचा दौरा केला. तसेच न्यायालयाच्या इमारतीची पाहणी केली.
यावेळी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष अप्पासाहेब मोरे, यश मेहता, गिरीश जोशी, मकरंद रेगे, मंडणगड तालुका बार असोसिएशनतर्फे अध्यक्ष ॲड. मिलिंद लोखंडे, ॲड. सचिन बेर्डे, ॲड. आदित्य सुळे, ॲड. सुमेश घागरुम ॲड. धनंजय करमरकर व सहकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. दौऱ्याचे निमीत्ताने श्री. पांडे यांनी कनिष्ठ न्यायालय भिंगळोली येथे मंडणगड तालुका बार असोसिएशनचे सर्व पदाधिकाऱ्यासमवेत चर्चा केली. न्यायालयाचे इमारतीचे कामकाज व उद्‍घाटन सोहळ्याची तयारी यांचा आढावा घेतला. या दौऱ्यात त्यांच्यासमवेत रायगड जिल्ह्यातील सरकारी वकील व रायगड जिल्हा अधिवक्ता परिषदेचे अध्यक्ष ॲड. संतोष पवार, रत्नागिरीचे सरकारी वकील ॲड. अनिरुद्ध फणसेकर, रत्नागिरी जिल्हा अधिवक्ता परिषदचे महामंत्री चिपळूण येथील ॲड. मिलिंद तांबे, खेड येथील ॲड. सिध्देश बुटला, मंडणगड नगरपंचायत मुख्याधिकारी अभिजित कुंभार आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Middle East War: पश्चिम आशियातील युद्धामुळे एलपीजीनंतर आता सीएनजीची टंचाई! ऑटो-रिक्षा भाडे वाढले; नवे दर किती?

मुस्लिम हिंदूंपेक्षा चांगला कसा? मुमताज यांच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया; म्हणाल्या- एकीला सोडून दुसरीशी लग्न...

SSC Exam Paper : ‘त्या’ केंद्रात विद्यार्थ्यांना वेळेत पेपर; सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर स्पष्ट

तो ऑडिओ हटवा नाहीतर... ते संभाषण लीक झाल्याने संतापली रश्मिका मंदाना; कारवाई करणार, नेमकं प्रकरण काय?

Indian Tourists : घर हलल्यासारखे झाले अन् आमची झोप उडाली, दुबईतील आँखो देखा हाल; क्षेपणास्त्र पडत होती....

SCROLL FOR NEXT