कोकण

उड्डाणपुलाखालील जागा घेणार मोकळा श्वास

CD

82082
कणकवली ः शहरातील उड्डाणपुलाखालील जागेतील वाहने हटविण्याची कारवाई आज पोलिस बंदोबस्तामध्ये सुरू केली.
82083
कणकवली ः उड्डाणपुलाखालील सर्व प्रकारची वाहने हटवताना ट्रक तसेच कार चालक मालक संघटनेचे सुरेश सांवत यांनी पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांच्याकडे पर्यायी जागा करून देण्याची मागणी केली.
82084
कणकवली ः उड्डाणपुलाखालील वाहने हटविल्यानंतर काही प्रमाणात येथील परिसर मोकळा झाला आहे.


उड्डाणपुलाखालील जागा घेणार मोकळा श्वास

कणकवलीत अतिक्रमणविरोधी मोहीम; चालक-मालक संघटनेतर्फे पर्यायी जागेची मागणी

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ४ ः शहरातील उड्डाणपुलाखालील सर्व अतिक्रमणे हटविण्याच्या कार्यवाहीला सुरवात झाली आहे. ही जागा मोकळी झाल्‍यानंतर तेथे नगरपंचायतीतर्फे सुशोभिकरण आणि सार्वजनिक सुविधा उभारल्‍या जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर आजपासून उड्डाणपुलाखालील जागेतील उभी सर्व प्रकारची वाहने हटविण्याची कारवाई सुरू केली. या कारवाईला प्रवासी आणि माल वाहतूक चालक-मालक संघटनेने विरोध केला आहे. आम्‍हाला पर्यायी जागा द्या; नंतरच वाहने हटविण्याची मोहीम राबवा, अशी मागणी या व्यावसायिकांनी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उड्डाणपुलाखालील जागेत वाहन पार्किंग तसेच कुठलेही व्यवसाय करण्यास परवानगी नाही. मात्र, शहरातील उड्डाण पुलाखालील जागेत भाजी विक्रेते, फळ आणि फुल विक्रेत्यांची व्यवस्था केली आहे. याखेरीज चहा आणि नाश्‍ता देणाऱ्या टपऱ्या, तयार कपडे, स्टेशनरी तसेच विविध वस्तूंची दुकाने आणि स्टॉल थाटले आहेत. याखेरीज सर्व प्रकारची अवजड वाहने पुलाखाली उभी केली जातात. रिक्षा आणि प्रवासी वाहतूक करणारी छोटी वाहनेही याच पुलाखाली उभी केली जातात. महत्त्वाची बाब म्‍हणजे शहरातील हॉटेल, लॉज व्यावसायिक तसेच खासगी आस्थापनांनीही त्‍यांच्या कार्यालयातील कर्मचारी, ग्राहकांच्या वाहनांसाठी उड्डाण पुलाखाली वाहन पार्किंगची सुविधा केली आहे. तसे फलकही उड्डापुलाखालील जागेत लावले होते.
कणकवली शहरात २०२० मध्ये उड्डाणपुलाची उभारणी होऊन त्‍यावरून वाहतूक सुरू झाली. उड्डाणपुलाखालील मिडकलकट वगळता उर्वरीत सर्व भाग लोखंडी बॅरिकेट्स लावून बंदिस्त केला होता. मात्र, हळूहळू उड्डाणपुलाखालील सर्व बॅरिकेट्स तोडले आणि ही जागा व्यावसायिक वापरासाठी खुली केली. उड्डाणपुलाखाली सर्व प्रकारचे उद्योग, व्यवसाय सुरू झाल्‍याने शहराला बकालपणाही येऊ लागला. याखेरीज उड्डाणपुलाखालील सर्वच ठिकाणी अनधिकृत मिडलकट तयार झाल्‍याने वाहन अपघातांचीही शक्‍यता निर्माण झाली. या सर्व प्रकाराकडे मनुष्यबळ नसल्‍याने राष्‍ट्रीय महामार्ग विभागाने दुर्लक्ष केले. ही जागा महामार्ग विभागाकडे असल्‍याने नगरपंचायतीलाही कारवाई करता येत नव्हती. यावर तोडगा म्‍हणून तत्‍कालीन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी उड्डाणपुलाखालील जागा नगरपंचायतीकडे हस्तांतरीत करण्याची परवानगी महामार्ग विभागाकडे पाठवली होती. काही अटी शर्ती देऊन महामार्ग विभागाने सुशोभिकरण आणि सार्वजनिक सुविधांच्या वापरासाठी ही जागा नगरपंचायतीकडे हस्तांतरीत केली आहे.
नगरपंचायतीने उड्डापुलाखालील जागेत सध्या दोन ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहांची उभारणी केली आहे. उर्वरित जागेत मुंबईतील उड्डाणपुलाखालील जागेत केलेल्या धर्तीवर बगीचा, पादचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी मार्ग आदी सुविधांची आखणी केली आहे. त्‍यासाठी अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही सुरू केली आहे. यात पहिल्‍या टप्प्यात सर्व प्रकारची खासगी वाहने हटवली जात आहेत. आजच्या कारवाईत पोलिस निरीक्षक अतुल जाधव, उपनिरीक्षक पन्हाळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. ज्ञानेश्‍वर सावंत, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक संदेश भोसले, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक चेतन पाटील, मितेश माने, कणकवली नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी अमोल अघम, रवींद्र म्‍हाडेश्‍वर, प्रवीण गायकवाड, प्रशांत राणे, संदीप राणे, विश्वनाथ कदम यांनी सहभाग घेतला होता.
--------------
‘मिडलकट’मुळे अपघात वाढले
शहरातील बसस्थानक, पेट्रोल पंप, तेलीआळी डीपी रोड या ठिकाणच्या मिडलकट भोवताली व्यावसायिकांनी दुकाने थाटल्याने मिडलकटवरून सेवा रस्त्यावर येणारी वाहनेही दिसत नाहीत. त्‍यामुळे येथे सातत्‍याने अपघातही होत आहे. त्‍यामुळे उड्डाणपुलाखालील अतिक्रमण हटविण्याची मागणी शहरवासीयांकडून होऊ लागली.
----------------
कोट
शहरात उड्डाणपूल उभारणी पूर्वीपासूनच महामार्गालगत वाहने उभी करून आम्‍ही माल आणि प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय करत आहोत. आता नगरपंचायत प्रशासन आम्‍हाला उड्डाणपुलाखालील वाहने काढायला सांगत आहे. मात्र, आम्‍ही जायचे कुठे? आम्‍हाला नगरपंचायतीने जागा उपलब्‍ध करून द्यावी; अन्यथा आम्‍ही वाहने हटवणार नाही. उड्डाणपुलाखाली अनेक खासगी वाहतूकदार वाहने उभी करतात. ही वाहने हटविण्यास विरोध नाही. मात्र, प्रवासी वाहतूक आणि माल वाहतुकीचा परवाना असलेली वाहने हटवली तर ती उभी करायची कुठे?
- सुरेश सावंत, वाहतूकदार, संघटना समन्वयक
---------------
उड्डाणपुलाखालील सर्व जागा मोकळी करून तेथे उद्यान निर्मिती आणि इतर सार्वजनिक सेवा सुरू करण्याचे नगरपंचायतीचे नियोजन आहे. सध्या भाजी विक्रेत्‍यांसाठी अन्यत्र जागा नाही. त्‍यासाठी पटवर्धन चौकालगतची नगरंपचायतीची जागा मोकळी करून तेथे या विक्रेत्‍यांचे स्थलांतर केले जाणार आहे. वाहतूकदार संघटनेशी चर्चा करून त्‍यांच्या प्रश्‍नावर तोडगा काढू. लवकरच गणेशोत्सवाला सुरवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन, आरटीओ, महसूल आणि इतर विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून शहरात वाहतुकीचे नियोजन केले जाणार आहे.
- गौरी पाटील, मुख्याधिकारी, कणकवली
-------------
पोलिस आणि आरटीओ प्रशासनाच्या माध्यमातून उड्डाणपुलाखालील जागेतील वाहने हटविण्याची कारवाई आम्ही करत आहोत. यापुढेही अशा कारवाईसाठी नगरपंचायतीला आमचे सहकार्य असेल. मात्र, वाहने हटवून झाल्‍यानंतर त्या जागेचे नगरपंचायतीने बंदिस्तीकरण करायला हवे. उड्डाणपुलाखालील जागेचे बंदिस्तीकरण झाले तर तेथे पुन्हा अतिक्रमण होणार नाही. ही बाब आम्‍ही नगरपंचायत प्रशासनाला कळवली आहे.
- अतुल जाधव, पोलिस निरीक्षक, कणकवली
-------------
कणकवली उड्डाणपुलाखालील कोणीही येऊन कुठलाही व्यवसाय करतोय. भंगार झालेली वाहने उड्डाणपुलाखालील उभी करून ठेवली जाताहेत. सडलेला भाजीपाला, टाकाऊ चीजवस्तू पुलाखालील मोकळ्या जागेत टाकून शहराचे विद्रूपीकरण केले जात आहेत. वाहन दुरूस्तीसह इतर उद्योगही तेथे सुरू आहेत. उड्डाणपुलाखालून कधीही कुठलेही वाहन बाहेर पडते. यात ज्‍येष्‍ठ नागरिकांना चालणे मुश्‍कील होते. सर्व पादचाऱ्यांचे, वाहन चालकांचे जीव धोक्यात आणले जातात. त्‍यामुळेच आम्‍ही कणकवली व्यापारी संघटनेतर्फे उड्डाणपुलाखालील अतिक्रमणे हटविण्यासाठी पाठपुरावा करत आहोत.
- अशोक करंबेळकर, सामाजिक कार्यकर्ता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump accuses India :''रशियाकडून तेल खरेदी करून भारत कमावतोय नफा'' ट्रम्प यांचा आरोप; अन् टॅरिफ वाढवण्याचीही धमकी!

Mumbai Weather: उकाड्यामुळे मुंबईकर हैराण! आता पाऊस कधी दरवाजा ठोठावणार? हवामान विभागाने वेळच सांगितली

Mumbai News: कबुतरखाना कारवाईविरोधात जैन समाज आक्रमक, उपोषणाचा दिला इशारा

IND vs ENG 5th Test: शुभमन गिलच्या ७५४, तर हॅरी ब्रूकच्या ४८१ धावा, तरीही दोघांना Player Of The Series पुरस्कार कसा? गंभीरचा 'Role'

Latest Marathi News Updates Live : अंजली दमानिया विरोधात वॉरंट जारी

SCROLL FOR NEXT