कोकण

दापोलीतून एक राखी जवानांसाठी उपक्रम

CD

- rat४p२१.jpg-
२५N८२१०१
दापोली ः सीमेवरील जवानांना राख्या पाठवताना दापोली येथील युवा प्रेरणा कट्टाची टीम.
---
दापोलीतून एक राखी जवानांसाठी उपक्रम
महाजन प्रतिष्ठान ; सीमेवरील सैनिकांसाठी स्नेहबंध
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. ४ : कै. कृष्णामामा महाजन प्रतिष्ठानच्या युवा प्रेरणा कट्टा या टीमतर्फे ‘एक राखी जवानांसाठी – देशाच्या रक्षकांसाठी’ हा उपक्रम यंदाही दापोलीत उत्साहात पार पडला. यावर्षी दापोलीतील शाळा, महाविद्यालये आणि स्थानिक महिलांच्या सहभागातून विविध ठिकाणांहून राख्या संकलित करून त्या थेट सीमेवरील तैनात जवानांपर्यंत पोहोचविण्यात आल्या आहेत.
यंदा अभियानाचा मुख्य हेतू ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर देशासाठी लढणाऱ्या जवानांप्रति कृतज्ञता व्यक्त करणे हा होता. अलीकडेच पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा यशस्वी प्रतिउत्तर देणाऱ्या भारतीय सैन्य दलाच्या धाडसाला सलाम करत हे अभियान समर्पित करण्यात आले. या उपक्रमात दापोलीतील अनेक विद्यार्थिनी आणि महिला भगिनींनी सहभाग घेत राख्या तयार करून पाठविल्या. पठाणकोट (पंजाब) येथील भारतीय वायू सेनेच्या हवाई तळावर तैनात जवानांसाठी तसेच मुंबईतील सशस्त्र सेना सामान चिकित्सा डेपोच्या कर्मचाऱ्यांसाठी या राख्या पाठविण्यात आल्या. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रमोद पांगारकर, नचिकेत बेहरे, संदीप गरंडे, श्रीप्रीती वैद्य, साक्षी करमरकर, सुमेध करमरकर, रोहन भावे यांच्यासह युवा प्रेरणा कट्ट्याच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. देशासाठी झटणाऱ्या जवानांशी राखीच्या माध्यमातून भावनिक नाते जोडणारा हा उपक्रम दापोलीतील नागरिकांच्या देशप्रेमाचे प्रतीक ठरत आहे.

कोट
भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त २०२२ मध्ये या उपक्रमाची सुरुवात झाली होती. तेव्हा ७५ हून अधिक शाळा-महाविद्यालयांतून राख्या गोळा करून जवानांपर्यंत पोहोचवल्या होत्या. त्यानंतर हा उपक्रम दरवर्षी अधिक व्यापक स्वरूपात राबवला जात आहे.

- मिहीर महाजन, दापोली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : निजामाचं गॅझेट स्वीकारलं म्हणता मग तुम्ही इंग्रजांच्या परिवारातले आहात का ? मनोज जरांगेंना राग अनावर, जीभ घसरली?

Dussehra 2025: चक्क...या गावात होते रावणाची पूजा? काय आहे नेमकी परंपरा जाणून घेऊयात

Dussehra Melava 2025 Live Update: संपूर्ण कर्जमुक्ती केल्याशिवाय निवडणुकीची तारीख जाहीर करु देणार नाही- जरांगे पाटील

Mangalwedha Farmers : स्वतःचे नुकसान बाजूला ठेवत सरकारलाच 15 रुपये मदतनिधी पाठवला

Latest Marathi News Live Update : भीमाशंकर साखर कारखान्याच्या 26व्या गळीत हंगामाचा शुभारंभ

SCROLL FOR NEXT