कोकण

सायबर जागरुकता मोहीम

CD

पैसाफंड इंग्लिश स्कूलमध्ये
सायबर जागरुकता मोहीम
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ४ : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचा सायबर वॉरियर क्लब आणि क्विक हिल फाउंडेशन यांच्या सहकार्याने पैसाफंड इंग्लिश स्कूलमध्ये सायबर सुरक्षा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांबद्दल माहिती देण्याती आली. ओटीपीद्वारे होणारी फसवणूक, गेमिंग फ्रॉड, सोशल मीडिया फसवणूक यांसारख्या सायबर गुन्ह्यांवर आधारित माहितीपूर्ण सादरीकरण, संवाद सत्र आणि प्रश्नोत्तर सत्र घेण्यात आले.
कार्यक्रमात सायबर वॉरियर क्लबचे सदस्य पार्वती रावल व संस्कृती जाधव यांनी सायबर गुन्हे टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या सावधगिरीबाबत उपाय याविषयी माहिती दिली. या कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षा शपथ घेतली आणि डिजिटल माध्यमात जबाबदारीने वागण्याची प्रतिज्ञा केली. पैसाफंड इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक सचिनदेव खामकर यांनी कौतुक केले. ते म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांना सायबर जागरूकतेचे शिक्षण मिळणे ही काळाची गरज आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India vs Bangladesh Asia Cup 2025 : भारताची अंतिम फेरी आजच निश्‍चित? आज बांगलादेशशी सामना, फिरकीपटूंचे वर्चस्व राहण्याची शक्यता

Navratri Fast Recipe: नवरात्रीचा उपवास करताय? मग आज बनवा उपवासाची इडली, सोपी आहे रेसिपी

आजचे राशिभविष्य - 24 सप्टेंबर 2025

PAK vs SL Live : पाकिस्तानचा विजय अन् श्रीलंकेचे पॅकअप! फायनलमध्ये IND vs PAK होऊ शकते मॅच... ; जाणून घ्या गणित

Panchang 24 September 2025: आजच्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र पठण व ‘बुं बुधाय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT