कोकण

रत्नागिरी कावड यात्रेला अभुतपूर्व प्रतिसाद

CD

-rat४p३१.jpg-
P२५N८२१५२
रत्नागिरी : सकल हिंदू समाजातर्फे सोमवारी आयोजित कावड यात्रेत सहभागी भाविक.
--------

कावड यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद
पहिले वर्ष ; सकल हिंदू समाजाचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ : सकल हिंदू समाजातर्फे आज प्रथमच आयोजित कावड यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. कावड यात्रा गयाळवाडी, मरूधर विष्णू समाज स्वामीनगर येथून सुरू झाली. पारंपरिक वेशभूषा व खांद्यावर कावड घेऊन यात्रा निघाली. या कावडमध्ये विविध नद्यांचे पवित्र जल आणण्यात आले होते. त्यानंतर राजिवडा येथील श्री काशीविश्वेश्वराला जलाभिषेक करण्यात आला. पुढील वर्षी मोठ्या उत्साहात कावड यात्रा काढण्याचा संकल्प करण्यात आला.
कावड यात्रेला सकाळी ७ वाजता सुरवात झाली. त्यानंतर कुवारबाव, साळवी स्टॉप, मारुती मंदिरमार्गे जेल नाक्यावरून (कै.) अरुअप्पा जोशी मार्ग, गोगटे कॉलेज येथून काशीविश्वेश्वर मंदिरात कावड यात्रा पोहोचली. कावडमध्ये विविध पवित्र नद्यांचे जल आणले होते. यामध्ये हरिद्वार येथील पवित्र गंगानदी, प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावरील जल, नर्मदा व चंद्रभागा, त्र्यंबकेश्वर येथील जल, स्थानिक नद्या काजळी व लोटेश्वर आणि बावनदी येथील जल संकलित करून कावडमध्ये भरले होते.
यात्रेत पारंपरिक गीते लावली होती. या गीतांवर नृत्य करत प्रवास केला. भगवे ध्वज फडकत होते. तसेच भगव्या रंगाच्या टोप्या, पारंपरिक पांढरा झब्बा अशा वेशात कावड घेऊन अनेक लोक यात्रेत सहभागी झाले. कावड यात्रेत जवळपास १०० कावड होत्या. या सर्व कावडमधून काशीविश्वेश्वर देवावर जलाभिषेक करण्यात आला. यंदा यात्रेचे पहिलेच वर्ष होते, तरीही भरपूर प्रतिसाद मिळाला. मरुधर विष्णू समाजाचे दीपक देवल, कांतिलाल मालवीय, चुन्नीलाल माळी, फत्तेसिंह राठोड, नरपतसिंह परिहार, विरम सिरवी आदींनी ही यात्रा यशस्वी होण्याकरिता मेहनत घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Blood Donation Rules: 'हे' लोक रक्तदान करू शकत नाहीत, निर्बंध का? सर्वोच्च न्यायालयात सरकारचा खुलासा

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादीचा होणार, येत्या मंगळवारी घोषणेची शक्यता

Pune News: रुग्णालयांच्या अवाजवी बिलांना आता बसणार चाप; आरोग्यमंत्र्यांकडून ‘स्टँडर्ड ट्रीटमेंट प्रोटोकॉल’ची महत्त्वपूर्ण घोषणा..

ऐश्वर्या आणि अविनाश नारकरांचा धमाकेदार डान्स, एनर्जी इतकी की तरुणांना सुद्धा लाजवेल, Viral Video

PM kisan 22nd Installment : पंतप्रधान मोदी आज 'पीएम किसान' चा २२ वा हप्ता जारी करणार; तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही? असं चेक करा

SCROLL FOR NEXT