कोकण

बौद्धवस्त्यांमधील स्मशानभूमीमध्ये सुविधांचा अभाव

CD

बौद्धवस्त्यांमधील स्मशानभूमीमध्ये असुविधा
उमेश सकपाळांकडून पाहणी ; उपाययोजनांची मागणी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ४ ः शहरातील बौद्ध वस्त्यांसाठी असलेल्या स्मशानभूमीतील अत्यंत असुविधाजनक परिस्थितीविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना शहर प्रमुख उमेश सकपाळ यांनी स्मशानभूमीची तातडीने पाहणी करून वस्तुस्थितीचा आढावा घेतला. ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेतल्या. पालिकेशी तत्काळ संपर्क साधून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली.
स्मशानभूमीला जाण्यासाठी सध्या कोणताही योग्य रस्ता उपलब्ध नाही. उभारलेली शेड चुकीच्या पद्धतीने बांधलेली असून ती जीर्ण झालेली आहे. शेजारील नदीमुळे जागेची धूप होत असल्याने संरक्षक भिंतीची गरज व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय अस्तित्वात असलेली शेड देखील दुरुस्त करणे अत्यावश्यक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याच मुद्द्यावर आमदार शेखर निकम यांच्या पुढाकाराने आयोजित बैठकीसही उमेश सकपाळ यांनी उपस्थिती दर्शवून, स्मशानभूमीच्या समस्यांबाबत सहकार्याची भूमिका मांडली. या स्मशानभूमीत आवश्यक सुधारणा तातडीने करण्यात येतील आणि पालिकेच्या माध्यमातून योग्य त्या उपाययोजना राबवण्यासाठी आपण सहकार्य करू, असे आश्वासन सकपाळ यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ठाणे-मुलुंडदरम्यान नवे रेल्वे स्थानक उभारण्यास मंजुरी; स्टेशनला आनंद दिघेंचे नाव देण्याची खासदारांची मागणी

पत्नी देवीशाचा एक प्रश्न अन् सूर्यकुमार यादवच्या कारकीर्दिला मिळाली कलाटणी; T20 World Cup विजेत्या कर्णधाराने अखेर सिक्रेट सांगितले

जुळून येती रेशीमगाठीनंतर पहिल्यांदा झी मराठीवर दिसणार ललित प्रभाकर, 'या' मालिकेत पहायला मिळणार

Navi Mumbai: मुक्या जीवांना हक्काच्या उपचारांची सुविधा मिळणार, नवी मुंबईत पशुवैद्यकीय रुग्णालय सुरू होणार; वाचा सविस्तर

Latest Marathi News Live Update : मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT