-rat४p२८.jpg-
२५N८२१३२
रत्नागिरी ः शहरातील कोकणनगर-प्रशांतनगर येथे पोलिसांनी अमली पदार्थ विरुद्ध केलेल्या कारवाई ताब्यात घेण्यात आलेला संशयितासोबत पोलिस पथक.
-------
कोकणनगरमध्ये ९६ हजारांचा गांजा जप्त
कोल्हापूर येथील तरुण दुचाकीसह ताब्यात ; पोलिसांचे छापासत्र सुरूच
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ ः शहरातील कोकणनगर ते प्रशांतनगर येथे पोलिस गस्त घालत असताना गांजा सदृश अमली पदार्थ विक्री करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ६९५.५ ग्रॅम वजनाचा गांजा व दुचाकीसह ९६ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. शहर पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सत्यजीत सदाशिव जाधव (वय ३३, रा. नाचणकर चाळ, एमआयडीसी रत्नागिरी. मूळ ः विकास नगर, स्टेशन रोड, इचलकरंजी ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. ३) रात्री नऊच्या सुमारास कोकणनगर ते प्रशांतनगर येथे निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात अमली पदार्थांना प्रतिबंध व कारवाई करण्याच्या अनुषंगाने जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या सूचनेनुसार शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांचे एक पथक कोकणनगर ते प्रशांतनगर येथे गस्त घालत होते. त्यावेळी दुचाकीवर बसून संशयित आक्षेपार्ह हालचाली करत असताना आढळला. पोलिस पथकाला या तरुणाचा संशय आला. त्यांनी त्याच्या ताब्यातील साहित्याची खात्री करण्यासाठी दोन पंचासमक्ष त्यांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातील दुचाकीत प्लास्टिक पिशवीमध्ये काळपट, हिरवट रंगाची पाने फुले, काड्या व बोंडे असलेल्या वनस्पतीचे शेंडे असलेला उग्र वासाचा गांजा सदृश अमली पदार्थ सापडला. पोलिसांनी त्याच्याकडून ६९५.५ ग्रॅम वजनाचा ३१ हजारांचा गांजा व त्याच्या ताब्यामध्ये असलेली ६५ हजाराची दुचाकी असा ९६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. संशयित तरुणाला ताब्यात घेतले शहर पोलिस ठाण्यात त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सागर शिंदे, साहाय्यक पोलिस फौजदार दीपक साळवी, पोलिस हवालदार पंकज पडेलकर, आशिष भालेकर, प्रशांत पाटील, अमोल भोसले, पोलिस कॉन्स्टेबल अमित पालवे यांनी केली.
---
तक्रार द्या...
जिल्ह्यात अमली पदार्थावर पोलिसांची कारवाई सुरू आहे. यासंदर्भात परिसरात कोणत्याही संशयास्पद हालचाली निदर्शनास आल्यास त्याची माहिती स्थानिक पोलिसांना द्या. तुमचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.