कोकण

‘विशेष सहाय्य’ लाभार्थ्यांना बिबवणेत मंजुरी प्रमाणपत्र

CD

82613

‘विशेष सहाय्य’ लाभार्थ्यांना
बिबवणेत मंजुरी प्रमाणपत्र
कुडाळ ः महसूल विभागाच्या वतीने १ ते ७ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणाऱ्या महसूल सप्ताहानिमित्त आज तालुक्यातील बिबवणे ग्रामपंचायत येथे विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांची डीबीटी पोर्टलवर नोंदणी करण्याबाबतचा कार्यक्रम पार पडला. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा परिषद मुख्याधिकारी रवींद्र खेबुडकर यांची उपस्थिती होती. याप्रसंगी विशेष सहाय्य योजनेतील नवीन मंजूर प्रकरणांमधील लाभार्थ्यांना मंजुरी आदेश प्रमाणपत्र विभागीय आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. विशेष सहाय्य योजनेतील एकूण पाच लाभार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. त्यामध्ये वैशाली बिबवणेकर, मालती हरमलकर, भारती भगत, सावित्री गावकर, सुभद्रा घाटकर या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुसे, तहसीलदार वीरसिंग वसावे, बिबवणे सरपंच सृष्टी कुडपकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: एकाचा पत्ता सुलभ शौचालय, बसल्या बसल्या सही घेतली का? राज ठाकरेंचा आरोप; निवडणूक अधिकार्‍यांचे स्पष्टीकरण

मोठी बातमी! 21 नोव्हेंबरला DK शिवकुमार होणार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री? सिद्धरामय्यांचं काय होणार? काँग्रेस सरकारवर मोठं संकट

Sikandar Shaikh Crime : पैलवान सिकंदर शेखच्या अटकेनंतर घरच्यांनी दिली प्रतिक्रिया म्हणाले...

Kabutarkhana: चार नवीन कबुतरखान्यांसाठी परवानगी, पण बाकीचे बंदच...; पालिकेचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची समझोता बैठक मुंबईत सुरु

SCROLL FOR NEXT