rat5p22.jpg
82287
मधुवंती देव
मधुवंती देव यांचे शनिवारी गायन
शास्त्रीय-भक्तिगीतांची मैफल; खल्वायनची ३१६ वी संगीत सभा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ : येथील खल्वायनच्या मासिक संगीत सभेत शनिवारी (ता. ९) किराणा, ग्वाल्हेर तसेच जयपूर, अत्रोली घराण्याच्या प्रसिद्ध गायिका व गुरू मधुवंती देव (पुणे) यांच्या शास्त्रीय, उपशास्त्रीय, तसेच भक्तिगीतांची मैफल रंगणार आहे. खल्वायनची ही सलग ३१६वी संगीत सभा आहे.
शनिवार सायंकाळी सहा वाजता ही मैफल अॅड. प्रसाद महाजनी आणि श्रीधर (बंडा) आगाशे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ होणार आहे. देव यांना लहान वयातच शास्त्रीय गायनाचे शिक्षण अंबेजोगाई येथे पंडित जुक्कलकर यांच्याकडून मिळाले. त्यानंतर पुणे येथील पंडित गंगाधरबुवा पिंपळखरे यांच्याकडून गायनाची तालीम घेतली. त्यांना पुण्याच्या एसएनडीटी विद्यापीठाने ‘गानहिरा’ पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत सुगम व शास्त्रीय संगीतासाठी गायनाचे सुवर्णपदक पटकावले असून, आकाशवाणीच्या त्या मान्यताप्राप्त कलाकार आहेत. या मैफलीसाठी देव यांना हार्मोनियमची साथ चैतन्य पटवर्धन, तर तबलासाथ प्रथमेश शहाणे करणार आहेत. मैफल विनाशुल्क असून, रसिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्था अध्यक्ष मनोहर जोशी यांनी केले आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.