कोकण

भावगीतांची भावस्पर्शी मैफल, अभंगांचा भक्तिरस, रसिक मंत्रमुग्ध

CD

82616

भावगीतांची भावस्पर्शी मैफल, अभंगांचा भक्तिरस, रसिक मंत्रमुग्ध

बांद्यातील ‘गुरुवंदना’; श्री देव बांदेश्वर संगीत कला वर्गाचा सोहळा

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ६ ः (कै.) गुरुवर्य दिगंबर उर्फ बाळू गाड संस्थापित श्री देव बांदेश्वर संगीत कला वर्गाचा ''गुरुवंदना'' कार्यक्रम येथे उत्साहात झाला. यावेळी वर्गाच्या शिष्यांनी विविध अभंग, नाट्यगीत, भावगीते सादर करून रसिकांची वाहवा मिळविली.
श्री विठ्ठल मंदिर बांदा येथे झालेल्या या गुरुवंदना कार्यक्रमाचे उद्घाटन गुरुवर्य गुरुदास गावकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, ज्येष्ठ पत्रकार उमेश गाड, मोपा माऊली मंडळाचे अध्यक्ष सत्यवान नाईक, बांदा ग्रामपंचायत सदस्य रुपाली शिरसाट, निवृत्त कृषी सहाय्यक बाबली गाड, गायक अरुणदत्त परब, ज्येष्ठ भजनकर्मी गिरीश महाजन, सगुण सावंत, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र गवस, मंडळाचे अध्यक्ष सीताराम गावडे, उपाध्यक्ष सुशांत नाईक, सचिव राजेश सावंत उपस्थित होते.
नारायण मोरजकर यांनी गणेश वंदना सादर केली. बांद्यातील प्रदीर्घ भजन सेवेबद्दल गिरीश महाजन, पुरस्कार विजेते उमेश गाड तसेच संगीत वर्गाचे गुरू गुरुदास गावकर यांचा सत्कार करण्यात आला. ऊर्वी देसाई, परी देसाई, निधी धारगळकर, संगीता येडवे, दिनेश नाईक, गोविंद राणे, विष्णू सावळ, संतोष सावंत, प्रकाश चव्हाण, आशुतोष भांगले, प्रवीण परब, अरुणदत्त परब यांनी विविध गीते, अभंग, सरगम गीतांचे सादरीकरण केले. त्यांना सुशांत नाईक, गुरुदास गावकर, आत्माराम रेडकर यांनी हार्मोनियम तर दिनेश परब, राजेश रेडकर, किशोर तेली यांनी तबला व संदेश देसाई यांनी टाळ साथ संगत केली. रसिकांच्या आग्रहास्तव महाजन यांनी भक्तिगीत सादर केले. गुरुदास गावकर यांच्या भैरवीने सोहळ्याची सांगता झाली. यावेळी विद्यार्थी वर्गाने गुरुपूजन केले.
आरंभी (कै.) दिगंबर गाड यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वर्गाच्या माध्यमातून (कै.) गाड यांचे नाव सदैव स्मृतीत राहील, अशी भावना सर्वांनी व्यक्त केली. गाड यांच्या विविध आठवणींना उमेश गाड यांनी उजाळा दिला. कार्यक्रमाला रत्नागिरीच्या सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका विनया परब, आसावरी गाड, स्वरदा गाड, सुनील नाटेकर, नीलेश मोरजकर, नंदू बांदेकर, क्रांती मोपकर, अरुण नाईक, लक्ष्मण सावळ, उमेश मयेकर, पोलिस हवालदार तेली, प्रवीण गाड आदींसह संगीतप्रेमी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रीना मोरजकर यांनी केले. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन आशुतोष भांगले यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Sawant railway issue : मुंबई-सावंतवाडी, दादर-रत्नागिरी, मुंबई-पंढरपूर आणि नांदेड-पुणे रेल्वे सुरू होणार का? खासदार अरविंद सावंत आक्रमक

Navi Mumbai Fraud : नवी मुंबईत एकलहरी बाबा, टणटण बाबाला अटक; दोघांनी मिळून महिलेला फसवलं; अघोरी पूजेच्या नावे...

Newlywed Bride Death : लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी नववधूचा अंत, रिसेप्शनहून परतताना अपघात; काका आणि मामाचाही मृत्यू, गाडीचं चाक निखळलं अन्...

लग्नात गायत्री दातारची आई असं काय म्हणाली की नवरा श्रीकांत मंडपातच रडायला लागला? व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : जळगाव जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेमुळे १५९ नागरिक बाधित

SCROLL FOR NEXT