82507
खचलेल्या मोऱ्या, खड्ड्यांनी
भरलेल्या रस्त्यांमुळे मनस्ताप
मनसे ः कुडाळ, मालवण, वेंगुर्लेचा प्रश्न
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ६ ः महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिष्टमंडळाने मुख्यमंत्री तथा पंतप्रधान ग्राम सडक विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय भोसले यांची भेट घेत कुडाळ, मालवण तसेच वेंगुर्ले येथील ग्रामीण भागांतील प्रस्तावित नवीन रस्ते आणि संबंधित विभागाच्या जुन्या रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत चर्चा केली. बऱ्याच रस्त्यांची दुरुवस्था झाली असून, नागरिकांना शारीरिक, मानसिक त्रास सहन कारावा लागत आहे, अशी नाराजीही यावेळी व्यक्त करण्यात आली.
प्रामुख्याने कविलगाव साई मंदिर रेल्वे स्थानक रस्ता, खड्डे बुजवणे आणि केरवडे तर्फ माणगाव नवीन रस्ता गणपतीपूर्वी बनविण्याची मागणी करण्यात आली. ग्रामीण भागांतील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात मोऱ्या खचणे व खड्ड्यांमुळे रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. असे बरेच रस्ते ग्रामसडक योजनेच्या नवीन कार्यक्रमाच्या प्रतीक्षेत आहेत. तेथील स्थानिक नागरिकांना फार त्रास आणि मनस्ताप सहन करावा लागत आहे. काम झालेल्या काही रस्त्यांवर खड्डे पडले असून, ते ठेकेदाराच्या जोखीम कालावधीत आहेत. ते खड्डे भरावेत. ज्या कामांचे कार्यारंभ आदेश झाले, ती कामे तातडीने पूर्ण करावीत. स्थानिक ठेकेदार सामूहिक संघटन करून ठेके भरत नसतील, तर बाहेरील ठेकेदारांना संधी द्यावी. नवीन प्रोग्राम व निधीसाठी वरिष्ठस्तरावर पाठपुरावा करावा, याबाबत चर्चा करून या मागण्यांची तातडीने पूर्तता करण्याची मागणी केली. यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज परब, कुडाळ तालुकाध्यक्ष हेमंत जाधव, उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, सुबोध परब, विद्यार्थी सेना अध्यक्ष यतिन माजगावकर, हेदुळ शाखाध्यक्ष सूरज पुजारे, अनिकेत ठाकूर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.