कोकण

प्रकृती खालावल्याने आईसह पत्नी रुग्णालयात

CD

82556

प्रकृती खालावल्याने आईसह पत्नी रुग्णालयात

सोनकुसरे कुटुंबाचे उपोषण; तिसऱ्या दिवशीही प्रशासनकडून दखल नाही

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ६ ः शासन निर्णयानुसार माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी तत्काळ हजर होण्याच्या दिलेल्या लेखी आदेशानुसार हजर होऊनही अद्याप नियुक्ती आदेश न दिल्याने, जानेवारीपासून सहा महिन्यांचे वेतन न मिळाल्याने तसेच वैयक्तिक मान्यता प्राप्त स्थायी कर्मचारी म्हणून नियुक्ती आदेश द्यावा, तसेच थकीत वेतन तत्काळ मिळावे, या मागणीसाठी जामसंडे येथील प्रमोद सोनकुसरे यांनी आपल्या कुटुंबासमवेत सोमवार (ता.४) पासून जिल्हा परिषदेसमोर सुरू केलेले बेमुदत उपोषण आज तिसऱ्या दिवशी सुरू होते. दरम्यान, त्यांची आई व पत्नीची प्रकृती खालावल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
श्री. सोनकुसरे यांचे म्हणणे आहे की, वारंवार पत्रव्यवहार व प्रत्यक्ष भेट घेऊन लक्ष वेधले असतानाही अद्याप नियुक्ती आदेश दिलेला नाही. तसेच जानेवारीपासून आजपर्यंत वेतन मिळालेले नाही. यामुळे आर्थिक अडचण व कुटुंबीयांची उपासमार होत आहे. त्यामुळे आता उपोषणाचा मार्ग धरावा लागला. मात्र, गेले तीन दिवस याची दखल घेण्यात आली नाही. केवळ थातुर-माथुर आश्वासने देऊन उपोषण सोडविण्याचा प्रयत्न होत आहे. जोपर्यंत मला अधिसंख्य पदावर नियुक्तीचे लेखी आदेश देण्यात येत नाहीत तसेच थकीत वेतन मिळत नाही, तोपर्यंत उपोषण करणार असल्याचे सोनसुरकर यांनी सांगितले. दरम्यान, आज उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी त्यांची आई व पत्नीची प्रकृती खालावल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तसेच श्री. सोनकुसरे व त्यांच्या मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी आरोग्य विभाग पथक उपोषणस्थळी दाखल झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जय शिवराय! 'या' सिनेमागृहात 'राजा शिवाजी' सिनेमा मोफत पाहता येणार, पहा संपूर्ण यादी

HSC result 2026 Maharashtra : बारावीचा निकाल 2 मे रोजी, 'या' लिंकवर निकाल पाहता येणार

Sunetra Pawar Banner in Pandharpur : 'माझा विठ्ठल...!' देवघरात अजितदादांची प्रतिमा, आता पंढरपूरच्या वेशीवर सुनेत्रा पवारांसाठी 'तो' बॅनर चर्चेत!

Mumbai Pune Expressway Traffic : वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनांकडून टोल घेऊ नका, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सूचना

Who is Arshad Khan? मुंबई इंडियन्सने पहिली संधी दिली अन् तो आता गुजरात टायटन्ससाठी ठरतोय एक्स फॅक्टर; RCB लाही दिलाय त्रास

SCROLL FOR NEXT