कोकण

डेरवण येथे जिल्हास्तरीय ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धा

CD

डेरवण येथे ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ ः रत्नागिरी जिल्हा ॲथलेटिक असोसिएशनच्यावतीने २३ व २४ ऑगस्ट या कालावधीत रत्नागिरी जिल्हा ज्युनिअर ॲथलेटिक्स अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. डेरवण क्रीडा संकुलात होणाऱ्या या स्पर्धेतून राज्य स्पर्धेसाठी जिल्हा संघाची निवड केली जाणार आहे.
३९वी महाराष्ट्र राज्य ज्युनिअर ॲथलेटिक्स अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा २ ते ५ सप्टेंबर या कालावधीत पुणे येथे होणार आहे. ही स्पर्धा १४, १६, १८, २० आणि २३ वर्षांखालील मुले व मुली या गटासाठी आहे. खेळाडूंनी आपल्या वयोगटात सहभागी होणे आवश्यक आहे. १२ वर्षांखालील खेळाडूंना या स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. सर्व खेळाडूंनी २१ ऑगस्टपूर्वी ऑनलाइन फॉर्म भरणे आवश्यक आहे. या स्पर्धेचे वेळापत्रक स्पर्धेपूर्वी दोन दिवस अगोदर जाहीर करण्यात येईल. एका स्पर्धकाला त्याच्या वयोगटात फक्त दोन क्रीडाप्रकारात सहभागी होता येईल. पात्रता निकष पार करणाऱ्या प्रथम तीन क्रमांकाच्या खेळाडूंची राज्य स्पर्धेसाठी निवड करण्यात येईल. खेळाडूंनी सोबत येताना वयाचा पुरावा म्हणून जन्मदाखला, १०वी व १२वीचे बोर्ड प्रमाणपत्र आणणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी रत्नागिरी जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव संदीप तावडे यांच्याशी संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT