कोकण

हेगशेट्ये महाविद्यालयात साठे जयंती

CD

हेगशेट्ये महाविद्यालयात साठे जयंती
रत्नागिरी : दोन भिन्न स्वभावाच्या आणि वेगळ्या विचारांच्या व्यक्ती महाराष्ट्राला खूप काही देऊन गेल्या. समाजात स्वराज्याची संकल्पना रूजवणारे टिळक आणि निव्वळ दीड दिवस शाळेत जाऊन ३५ कादंबऱ्या लिहिणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांचे लिखाण, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांचे योगदान या दोन्ही गोष्टी नव्या पिढीला प्रेरणा देणारे आहे, असे प्रतिपादन नवनिर्माण शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष अभिजित हेगशेट्ये यांनी केले. ते लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी त्याचबरोबर कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.


कुर्धेतील विद्यार्थ्यांकडून जवानांना राख्या
पावस ः जिल्हा परिषद कुर्धे शाळेतर्फे रक्षाबंधननिमित्त सीमेवरील जवानांना राख्या रवाना करण्यात आल्या. कुर्धे शाळेमार्फत कार्यानुभव उत्पादक उपक्रमांतर्गत राख्या तयार करण्यात आल्या. रक्षाबंधनाबरोबरच शाळेमार्फत देशाचे अहोरात्र रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी विद्यार्थ्यांनी स्वतः राख्या तयार केल्या. या राख्या कमांडिंग ऑफिसर यांच्या पत्त्यावर पाठवण्यात आल्या आहेत. या उपक्रमात शाळेचे मुख्याध्यापक विश्वजित नवाथे, शिक्षक शहनाज भाटकर, नारायण झगडे, सुचित मयेकर, श्रीकृष्ण फुलझळके यांचे मार्गदर्शन लाभले.

गांधी प्रतिष्ठानची १८ला सभा
चिपळूण : निसर्गरम्य गांधारेश्वर, गांधीघाट येथील महात्मा गांधी रक्षाकलश समाधीची देखभाल, व्यवस्थापन व गांधीविचारांचा प्रचारप्रसार करणाऱ्या गांधी प्रतिष्ठान चिपळूणच्या सभासदांची वार्षिक सर्वसाधारण सभा १८ ऑगस्टला सकाळी ११ वाजता संस्थेच्या कार्यालयात होणार आहे. यावेळी संस्थेच्या सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष विनायक होमकळस व सचिव सुनील खेडेकर यांनी केले आहे.

बदलत्या स्वरूपानुसार काम केल्यास नॅक यशस्वी
राजापूर ः प्रत्येक महाविद्यालयांना नॅकला सामोरे जाताना अनेक आव्हानांचे शिवधनुष्य पेलताना महाविद्यालयांची दमछाक होते; मात्र त्यातील गुणांकन पद्धती, मूल्यांकन पद्धती, त्याचे सूक्ष्म अवलोकन यावर भर देत नॅकच्या बदलत्या स्वरूपानुसार काम केल्यास नॅक यशस्वी करता येईल, असे प्रतिपादन डॉ. नागनाथ धर्माधिकारी यांनी केले. यावेळी संस्था सरचिटणीस नरेश पाचलकर, डॉ. ए. डी. पाटील, प्रभारी प्राचार्य डॉ. पी. एस. मेश्राम आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT