-rat८p२७.jpg-
२५N८३०५५
राजापूर ः संस्कृत दिनानिमित्ताने झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना गौरवताना जगदीश पवार, डॉ. छाया जोशी.
----
संस्कृत दिनी विद्यार्थ्यांचा गौरव
राजापूर हायस्कूलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ८ ः राजापूर हायस्कूल येथे संस्कृत दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी राजापूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षा डॉ. छाया जोशी, कार्यवाह प्रकाश भावे, संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षा डॉ. जोशी, जगदीश पवार-ठोसर, मुख्याध्यापक भालशंकर, उपमुख्याध्यापक पोवार, पर्यवेक्षिका दर्शना मांडवकर, शोभा जाधव, आरती सप्रे आदी उपस्थित होते.
संस्कृतदिनाचे औचित्य साधून दैनंदिन जीवनातील वस्तूंना संस्कृतमध्ये असणारी नावे विद्यार्थ्यांना माहिती व्हावीत, या उद्देशाने संस्कृत वस्तूंचे प्रदर्शन मांडण्यात आले. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध वस्तूंच्या प्रदर्शनाचे कौतुक झाले. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक नागपूर आयोजित रवीकीर्ती संस्कृत अध्ययन केंद्रामार्फत (सांगली) घेतलेल्या राज्यस्तरीय संस्कृत परीक्षेमध्ये जिल्हास्तरीय प्रथम अंतरा झिंबरे (सुवर्णपदक), रुद्र सवादे (सुवर्णपदक), मिताली आडविलकर (रौप्यपदक), गार्गी बाकाळकर (सुवर्ण), मयुरी भोसले (रौप्य), अनुष्का आग्रे (कास्य), सिद्धेश शिंदे (कास्य). शालेय पातळीवर प्रथम क्रमांक समीक्षा खांबल, सान्वी ओळकर, साध्वी टिळेकर, प्राची कुवळेकर यांना प्रमाणपत्र व चषक देऊन गौरवण्यात आले. संस्कृत भारतीतर्फे देववाणी परीक्षेला ९३ विद्यार्थी बसले. त्यापैकी ३७ विद्यार्थ्यांना विशेष श्रेणी प्राप्त झाली. त्यांचाही प्रशस्तिपत्र आणि संस्कृत पुस्तकं बक्षिसे देण्यात आली.