कोकण

महावितरणच्या कारभाराविरोधात ''महाआरती''

CD

83661

महाआरतीने महावितरणच्या बेजबाबदार कारभाराचा निषेध
मळेवाडला ठाकरे शिवसेनेचे अनोखे आंदोलनः अधिकारी, कर्मचाऱ्यांना सद्बुध्दीची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मळेवाड, ता. ११ ः ठाकरे शिवसेनेच्या वतीने रविवारी (ता. १०) मळेवाड चौकातील श्री गणेश मंदिरात महाआरतीने महावितरणाच्या कारभाराविरोधात सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांच्या नेतृत्वाखाली अनोखे आंदोलन करण्यात आले. महावितरणाच्या कर्मचारी व अधिकारी वर्गाला गणरायाने सद्बुद्धी द्यावी व आगामी काळात गणेश चतुर्थी सण प्रकाशमय व्हावा, असे साकडे यावेळी घालण्यात आले.
या आंदोलनाची कल्पना देऊनही महावितरणचे जबाबदार अधिकारी गैरहजर राहिल्यामुळे आंदोलनकर्त्या शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. गणरायाची महाआरती झाल्यानंतर मळेवाड येथे कार्यरत जबाबदार अधिकारी उपस्थित झाल्यामुळे शिवसैनिकांनी आक्रमक होत त्यांना जाब विचारला.
यावेळी रुपेश राऊळ यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. येत्या आठ दिवसांत सुरळीत वीजपुरवठा न झाल्यास गय केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला, तर १८ ऑगस्टपर्यंत वीजपुरवठा सुरळीत केला जाईल, असे आश्वासन यावेळी महावितरण अधिकाऱ्यांनी दिले.
यावे महाआरतीसाठी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, तालुकाप्रमुख मायकल डिसोजा, जिल्हा परिषद सदस्य राजन केरकर, वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, निशांत तोरसकर, गुरुनाथ नाईक, नीलेश शिरसाट, बाळा रेडकर, रवी तळवणेकर, मुन्ना मुळीक, नंदू नाईक, प्रकाश राऊत, वासुदेव राऊळ, सचिन गावडे, नम्रता झारापकर, स्मिताली नाईक, शिल्पा नाईक, सुभद्रा नाईक, प्रशांत नाईक, बाळा आरोंदेकर, संतोष पेडणेकर, अनिल विर्नोडकर, संजय रेडकर, गोकुळदास मोठे, रामदास पेडणेकर, सारंग कोरगांवकर, तुषार पालव, नितीन कांबळी, बबन राऊत, रवींद्र काजरेकर, रवी सावंत, अनिल जाधव, विलास परब आदी ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, रिक्षा व्यावसायिक व मळेवाड चौकातील व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळणार! कधी अन् कुठे, IMDने तारीखच सांगितली

Zomato delivery boy accident: झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय मुसळधार पावसात पडला उघड्या गटारात अन् मग...

मुंबई-वडोदरा एक्सप्रेसवेचे काम अंतिम टप्प्यात, प्रवासात पाच तासांची बचत; कधीपासून होणार वाहतूक सुरु?

Mhada House: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! म्हाडाचे घर होणार आणखी स्वस्त, किती टक्क्यांनी घटणार; वाचा अहवाल

PM Modi and Zelenskyy : मोठी बातमी! आता मोदी अन् झेलेन्स्कींचीही झाली चर्चा; जाणून घ्या, कोण काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT