कोकण

शासकीय रुग्णवाहिका चालकांना आठ तासांची सेवा निश्चित करा

CD

83727

शासकीय रुग्णवाहिका चालकांना
आठ तासांची सेवा निश्चित करा

प्रसाद करलकर यांचे उपोषण

सिंधुदुर्गनगरी, ता. ११ ः शासकीय रुग्णवाहिकेवर कार्यरत असलेल्या वाहन चालकांना आठ तासांची सेवा निश्चित करून प्रत्येक रुग्णवाहिकेवर तीन चालक नियुक्त करावे. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांत एमबीबीएस डॉक्टर नियुक्त करावे, या मागणीसाठी कोचरा मठवाडी (ता. वेंगुर्ले) येथील प्रसाद करलकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
करलकर यांनी जिल्हा प्रशासनास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात रुग्णवाहिकांवर कार्यरत असलेल्या वाहनचालकांना १२ ते १४ तास अविरत सेवा द्यावी लागत आहे. काही वेळा २४ तास सेवा करावी लागते. यामुळे अपघात होऊन रुग्णांना धोका निर्माण होऊ शकतो. याचा विचार करून शासनाने सर्व शासकीय रुग्णवाहिकांवर सेवा बजावणाऱ्या चालकांची सेवा ८ तासांची निश्चित करावी. तसेच प्रत्येक रुग्णवाहिकेसाठी तीन चालक नियुक्त करावे. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांत एमबीबीएस डॉक्टर नियुक्त करावे. जिल्ह्यात सद्यस्थितीत कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या वाहनचालक आणि सफाई कामगारांना शासकीय कर्मचारी म्हणून कायम सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी करलकर यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आज करलकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी! राज ठाकरे देखील मविआसोबत; निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार

Gold Prices: सोन्याचे वाढलेले भाव म्हणजे धोक्याचा इशारा; 1973 मध्ये नेमकं काय घडलं होतं?

Who is Mahika Sharma? : कोण आहे हार्दिक पंड्याची नवीन गर्लफ्रेंड माहिका शर्मा? दोघांमध्ये नेमकं किती वर्षांचं अंतर?

IND vs WI 2nd Test Live: यशस्वी जैस्वाल खरंच RUN OUT होता का? यष्टिरक्षकाने बेल्स उडवल्या तेव्हा... वादग्रस्त निर्णय? Video

AIमुळे जॉब जाणार नाही, तर निर्माण होणार? पुढील ५ वर्षात भारतात ४० लाख रोजगार निर्मिती, NITI आयोगाचा दावा

SCROLL FOR NEXT