83917
‘एआय’ तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग करा
वीरसिंग वसावे ः ‘कुडाळ तहसील’मध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १२ ः ‘‘सरकारी कामात ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या वापराविषयी जागरुकता निर्माण करणे आणि त्याचा प्रभावी उपयोग कसा केला जाऊ शकतो, हे शिकवण्याच्या उद्देशाने तहसील कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले,’’ असे प्रतिपादन तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी केले. हे प्रशिक्षण कुडाळ तहसीलचा व्हॉट्सअॅप चॅनलवर प्रक्षेपित करण्यात आले.
येथील तहसील कार्यालयात महसूल सप्ताहानिमित्त महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी गुरुवारी (ता. ७) एआय तंत्रज्ञानावर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता. ‘एमकेसीएल’चे जिल्हा समन्वयक प्रणय तेली यांनी याबाबत उत्कृष्ट प्रशिक्षण दिले. यावेळी नायब तहसीलदार अमरसिंग जाधव, नायब तहसीलदार संजय गवस आदी उपस्थित होते.
या प्रशिक्षण कार्यक्रमात श्री. तेली यांनी ‘एआय’च्या मूलभूत संकल्पनांपासून ते त्याच्या वापराची उदाहरणे दिली. प्रशिक्षणामध्ये डेटा ॲनालिसिस, मशीन लर्निंग आणि बॉट्स यांचा समावेश होता. यामुळे सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या कामकाजातील प्रक्रियांना अधिक कार्यक्षमतेने पार पाडण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रशिक्षणानंतर संबंधितांनी प्रश्न विचारले आणि चर्चा केली. त्यामुळे त्यांच्या ज्ञानात वृद्धी झाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. कुडाळ तहसील कार्यालयाच्या या उपक्रमाचे उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वागत केले. त्यामुळे स्थानिक प्रशासनात नव्या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्यास चालना मिळेल, अशी आशा व्यक्त करण्यात आली. श्री. जाधव यांनी, येथील तहसीलमध्ये व्हॉट्सअॅप चॅनलवर प्रक्षेपित केले आहे. यामागे उद्देश म्हणजे तहसील कार्यालयातील सेवांचा भरपूर प्रचार करणे हा असल्याचे सांगितले. ग्रामपंचायतीने देखील यासंदर्भात प्रचार व प्रसिद्धी करण्याची अपेक्षा व्यक्त केली. मंडल अधिकारी गंगावणे यांनी आभार मानले.
....................
‘एआय’ शिवाय पर्याय नाही!’
तहसीलदार वसावे म्हणाले, ‘‘आपण वेगळ्या युगात प्रवेश केला आहे. ‘एआय’चा वापर न करणाऱ्या व्यक्तींना आता स्पर्धेत टिकणे कठीण होणार आहे. आजचे प्रशिक्षण खूप महत्त्वाचे आहे. या प्रशिक्षणामुळे त्याच दिवशी कामाची प्रक्रिया जलद होईल, अशी अपेक्षा आहे. एआय वापरणारे अधिकारी कार्यक्षमता वाढवतील. भविष्यामध्ये ‘एआय’ शिवाय पर्याय नाही, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.