- rat१३p४.jpg-
२५N८४१२४
चिपळूण ः सुभाष गुडेकर यांचा कोकणरत्न पुरस्काराने गौरव करताना मान्यवर.
पडेवकर, बुरबाडकर यांचा
समाजभूषण पुरस्काराने गौरव
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १३ ः येथील संत गोरा कुंभार विकास मंडळ व संत गोरा कुंभार नागरी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सभेत विष्णू पडेवकर आणि मनोहर बुरबाडकर यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले तसेच कोकणातील ९ जणांना कोकणरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
चिपळूण येथे झालेल्या सभेत समाजातील दहावी, बारावी, पदवी, पदविका उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तर समाजातील विशेष योगदान देणाऱ्या समाजबांधवांना कोकणरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले. यामध्ये रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सुभाष गुडेकर, सुरेश पालकर (गुहागर), अनंत महाडकर (रायगड), नारायण साळवी ( सिंधुदुर्ग), भास्कर कल्याणकर (ठाणे), मोहन कुंभार (नवी मुंबई), सुरेश बोरसे ( मुंबई), भानुदास गोऱ्हेकर (पालघर), उमेश खैर (गुहागर) यांना कोकणरत्न पुरस्काराचा मान मिळाला. या कार्यक्रमाला संस्थापक अध्यक्ष सतीश दरेकर, प्रदेशाध्यक्ष रमाकांत क्षीरसागर, महिला प्रदेशाध्यक्षा रसिका खेडेकर, कार्याध्यक्ष महेश सायकर, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. सुरेश काळे, कोअर कमिटी अध्यक्ष संजय रूईकर, यशवंत शेंदुलकर, विलास गुडेकर, प्रा. गणपत शिरोडकर, रमेश साळवी, उपाध्यक्ष वसंत घोडनदीकर, अनंत कुंभार आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.