- rat१३p६.jpg-
P२५N८४१२६
दापोली - जिम्नॅस्टिक ट्रॅम्पोलिन राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक मिळवल्यानंतर आपल्या प्रशिक्षकांसोबत आनंद व्यक्त करताना नकुल.
---
जिम्नॅस्टिक ट्रॅम्पोलिनमध्ये नकुलला सुवर्ण
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा; भारतीय संघाकडून दाखवले कौशल्य
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. १३ ः तालुक्यातील मांदिवली गावातील भावेश कारेकर यांचा मुलगा नकुल कारेकर याने जिम्नॅस्टिक ट्रॅम्पोलिन राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. ही स्पर्धा उत्तराखंड येथील डेहराडूनमध्ये झाली. नकुल हा सध्या पुण्यातील हिंजवडी येथील श्री स्पोर्ट्स अॅकॅडमी येथे श्रीकांत राठोड यांच्याकडे कलात्मक जिम्नॅस्टिक्स आणि ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक याचे प्रशिक्षण घेत आहे.
ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक्स हा एक स्पर्धात्मक ऑलिम्पिक खेळ आहे ज्यामध्ये खेळाडू ट्रम्पोलिनवर उसळताना ॲक्रोबॅटिक्स करतात. स्पर्धेमध्ये सरळ, पाईक, टक किंवा स्ट्रॅडल पोझिशनमध्ये फॉरवर्ड आणि बॅकवर्ड सॉमरसॉल्ट्स आणि ट्विस्टच्या उड्यांचा समावेश असतो. गेल्या वर्षी नकुलने हाँगकाँग येथे झालेल्या ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक्स आशियाई चॅम्पियन स्पर्धेसाठी भारतीय संघाकडून आपले कौशल्य दाखवले होते. भविष्यात नकुल आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय संघासाठी नक्कीच पदक घेऊन येईल, अशी खात्री त्याच्या प्रशिक्षकांसहित त्याचे वडील भारत कारेकर यांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.