bihar vidhansabha election
sakal
मतदारांच्या ‘मता’बरोबरच ‘मनोगता’चीही दखल राजकीय पक्ष घेऊ लागले तर त्याचा लोकशाहीच्या दृष्टीने उपयोग होईल.
भविष्यात काय घडणार, याचे कुतूहल ही अगदी स्वाभाविक भावना असते. त्यामुळेच मतदान झाले की, निकालांविषयी लोकांची उत्कंठा ताणली जाते. ‘कल चाचण्या’ (ओपिनियन पोल) आणि ‘मतदानोत्तर चाचण्या’ (‘एक्झिट पोल) अलीकडच्या काळात फोफावल्या आहेत, त्याचे कारण हेच.