कोकण

-देश माझा, मी देशाचा

CD

संतांचे संगती--------लोगो
(७ ऑगस्ट टुडे ३)

जगाच्या पाठीवर असलेल्या अनेक देशांमध्ये स्वतःचे वेगळेपण जपणारा देश म्हणजे आपला भारत देश. या देशाचे नावच किती यथार्थ आहे. भा म्हणजे बुद्धी, भा म्हणजे प्रकाश यात रमणाऱ्या लोकांचा देश तो भारत देश. कर्तव्यदक्ष, प्रजापालनतत्पर, भरत राजावरून आपल्या देशाला भारत हे नामाभिधान प्राप्त झाले.

- rat१३p१.jpg-
P25N84121
- धनंजय चितळे
---
देश माझा, मी देशाचा
आपला देश सोडून इतर कोणत्याही देशाला माता असे म्हटले जात नाही. आपण १५ ऑगस्ट, २६ जानेवारी रोजी जे करतो ते केवळ ध्वजारोहण नसते तर ध्वजवंदन असते. या वंदन शब्दातून आपली संस्कृती देशाप्रतीचा कृतज्ञभावच आपल्याला शिकवते. आपल्यावरील हे संस्कार प्राचीन काळापासून होत आहेत. अथर्ववेदामध्ये ही पृथ्वी आमची माता असून, आम्ही तिची लेकरं आहोत, असा उल्लेख आला आहे. पुराणांमध्येही याबाबतचे संदर्भ मिळतात. भारताचे क्षेत्रफळ त्याची सीमारेषाबद्दल विविध पुराणग्रंथात सविस्तर माहिती दिली आहे. विष्णूपुराणकार सांगतात
उत्तरं यत समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम्।
वर्ष तद् भारतं नाम भारती यत्र सन्ततिः।।
म्हणजेच, जो देश समुद्राच्या आणि हिमालयाच्या दक्षिणेला आहे तो भारत देश असून, भारताची प्रजा निवास करते. विविध पुराणांमध्ये तत्कालीन भारत वर्षातील भूभागांची म्हणजे अंतर्गत राज्य (जनपदे) कोणती होती, त्यांची नावे आली आहेत. या नावांमध्ये सध्याचा सिंध प्रांत, बल्ख प्रदेश यांचाही समावेश होतो. थोडक्यात राजनैतिक सीमारेषा असणारा भारत देश ही आधुनिक संकल्पना असेल तर सांस्कृतिक भारत देश ही पुराण काळापासूनची संकल्पना आहे. विष्णूपुराणकार सांगतात, हजारो जन्मांच्या पुण्यसंचयामुळे जीवाला भारतवर्षात मनुष्यजन्म प्राप्त होतो. नारद पुराण सांगते, भारतवर्ष ही सर्वाधिक पवित्र भूमी आहे. ही भूमी देवतांनासुद्धा दुर्लभ आहे. सुप्रसिद्ध श्री भागवत पुराण सांगते की, अन्य देशात दीर्घायुष्य मिळण्यापेक्षा भारतभूमीवर अल्पायुष्य मिळणे, हे श्रेयस्कर आहे. भागवत पुराणाच्या पाचव्या स्कंधातील अकराव्या अध्यायात देवतांचे उद्गार दिले आहेत. देवता म्हणतात, आमच्या पुण्याचरणामुळे आम्हाला स्वर्गाची प्राप्ती झाली; पण ज्यांनी आमच्यापेक्षा अधिक पुण्य केले त्यांना भारतभूमीवर जन्म मिळाला. याच अध्यायात या देवता श्रीभगवंतांची प्रार्थना करतात की, आमचे जे पुण्य शिल्लक आहे ते खर्ची टाकून आम्हाला भारतात जन्म दे. आपल्या देशाची महती इतकी श्रेष्ठ असताना आम्हाला मेरा भारत महान, असे का बरे वाटत नाही? आम्ही आमच्या कर्तव्यात कमी तर पडत नाहीना? आपल्या पूर्वजांनी या देशासाठी सर्वस्वाचे दान दिले जणू त्यांनी देशसेवेचे असिधाराव्रतच स्वीकारले. देश स्वतंत्र झाल्यावर त्याच उत्कट प्रेमाने ते स्वराज्याचे सुराज्य होण्यासाठी कार्यमग्न राहिले. आजही आपल्या देशाला विश्वातील सर्वोच्च स्थान देण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी देशसेवा करण्याचा संकल्प केला पाहिजे. आपली प्रत्येक कृती देशाच्या उन्नतीसाठी कशी होईल याचाच विचार सतत केला पाहिजे‌.
सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवणे, कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदान करणे, शासकीय कर प्रामाणिकपणे भरणे ही देशसेवाव्रताचीच अंगे आहेत. येत्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी आपण देशसेवा व्रताचा संकल्प करूया आणि न उतता, न मातता तो पूर्ण करण्यासाठी कार्यरत राहूया.

(लेखक संत आणि संस्कृतीचे अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: 'सातारा जिल्ह्यातील आशिष महांगरे बनला संशाेधक'; जिद्दीच्या बळावर यशाला गवसणी, जर्मनीत करणार संशोधन

Pune : जिम ट्रेनर तरुणीने दुकानाच्या दारातच केली तरुणाची हत्या, घटनेनंतर स्वत: पोलिसात हजर; मित्रासह दोघांना अटक

Pakistan Independence Day : पाकिस्तानात स्वातंत्र्यदिनीच पसरली शोककळा, हवेत गोळीबारात चिमुकलीसह ३ ठार, ६५ गंभीर जखमी

Chh. Sambhajinagar: “मैं जा रहा हूँ” असा मेसेज पाठवून २३ वर्षीय युवकाने संपवले जीवन; वाळूज एमआयडीसी परिसर हादरला

Satara News: अकरावी प्रवेशासाठी आता ‘विशेष फेरी’; मंगळवारपासून प्रवेश निश्‍चित करता येणार, सुधारित वेळापत्रक जाहीर

SCROLL FOR NEXT