swt132.jpg
84181
कट्टाः वराडकर हायस्कूलमध्ये रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला.
कट्टा प्रशालेत रक्षाबंधनातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १३ : रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा येथे स्काऊट गाईड व हरित सेना विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमांतर्गत वृक्ष रक्षाबंधन व परिसरातील रिक्षा बांधव, ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांना राखी बांधत सामाजिक बांधिलकी जपली. ‘झाडे लावा झाडे जगवा’ असा संदेश देणारी आकर्षक राखी स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी कट्टा बाजारपेठ येथील पिंपळ वृक्षाला बांधली. यावेळी स्काऊट गाईड विभाग प्रमुख समीर चांदरकर, हरित सेना विभाग प्रमुख बाळकृष्ण वाजंत्री, स्काऊट शिक्षक एकनाथ राऊळ, किसन हडलगेकर, भूषण गावडे, गाईड शिक्षिका सिमरन चांदरकर उपस्थित होत्या. या उपक्रमासाठी स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांचे अध्यक्ष अजयराज वराडकर, सचिव सुनील नाईक, विजयश्री देसाई, मुख्याध्यापिका देवयानी गावडे, पर्यवेक्षक महेश भाट, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी झाडांच्या बियांपासून आकर्षक पर्यावरणपूरक राख्या बनविल्या. प्रशाळेच्या कला विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या उपक्रमात पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करत आकर्षक राख्या बनवून वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला.
...................
swt133.jpg
84182
मालवण ः वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांसह मान्यवर.
वक्तृत्व स्पर्धेत ओजस्वी साळुंके, पार्थ सामंत प्रथम
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १३ : येथील नगर वाचन मंदिर येथे विंदा रामकृष्ण जोशी यांच्या स्मरणार्थ आयोजित वक्तृत्व स्पर्धेत टोपीवाला हायस्कूलच्या पाचवी ते सातवी गटात ओजस्वी साळुंके, आठवी ते दहावी गटात पार्थ सामंत यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेमध्ये पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
सकाळच्या सत्रात तालुकास्तरीय स्पर्धा, तर दुपारच्या सत्रात जिल्हास्तरीय स्पर्धा पार पडली. उर्वरित निकाल असा ः पाचवी ते सातवी-द्वितीय सोहम धामापूरकर (टोपीवाला हायस्कूल), तृतीय स्वरा बांदेकर (भंडारी हायस्कूल), उत्तेजनार्थ नागेंद्र तारी (भंडारी हायस्कूल), रेणुका चव्हाण (भंडारी हायस्कूल). आठवी ते दहावी गट-द्वितीय अस्मी आठलेकर (टोपीवाला हायस्कूल), तृतीय संस्कृती नाईक (टोपीवाला हायस्कूल). स्पर्धेचे उद्घाटन संग्राम कासले व वेदांत नाईक यांनी दीपप्रज्वलन करून केले. देवी सरस्वती आणि विंदा जोशी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. प्रास्ताविक व स्वागत ग्रंथपाल संजय शिंदे यांनी केले. दुसऱ्या गटाचे परीक्षण विनायक कोळंबकर व अमित खोत यांनी केले. यशस्वी स्पर्धकांना त्यांच्या पालकांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रेया चव्हाण, प्रतिभा पेडणेकर, रमाकांत जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.